५0 टक्के जलसाठे अजूनही ज्योत्याखालीच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 5, 2018 12:24 AM2018-07-05T00:24:55+5:302018-07-05T00:25:14+5:30
जिल्ह्यातील तीनपैकी इसापूर धरणात ३ टक्के जलसाठा झाला असून इतर दोन धरणे मृतसाठ्यात आहेत. तर लघुपाटबंधारेच्या २५ पैकी केवळ १२ तलावांमध्येच २५ टक्क्यांच्या आत जलसाठा झाला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
हिंगोली : जिल्ह्यातील तीनपैकी इसापूर धरणात ३ टक्के जलसाठा झाला असून इतर दोन धरणे मृतसाठ्यात आहेत. तर लघुपाटबंधारेच्या २५ पैकी केवळ १२ तलावांमध्येच २५ टक्क्यांच्या आत जलसाठा झाला आहे.
हिंगोली जिल्ह्यात आतापर्यंत २७.५0 टक्के पर्जन्यमान झाले आहे. यात हिंगोली २४५ मिमी, वसमत २७४ मिमी, कळमनुरी-२४0 मिमी, औंढा नागनाथ २४८ मिमी तर सेनगाव तालुक्यात २२0 मिमी पावसाची नोंद झाली आहे. जिल्ह्यात या पावसाळ्यात आतापर्यंत सरासरी २४४ मिमी पावसाची नोंद झाली. सर्वाधिक २९.६१ टक्के पर्जन्य औंढा नागनाथ तालुक्यात झाले आहे. तर कळमनुरीत सर्वांत कमी २६.१८ मिमी पावसाची नोंद झाली आहे.
हिंगोली जिल्ह्यातील सिद्धेश्वर व येलदरी ही दोन्ही धरणे मृतसाठ्यातच आहेत. इसापूर धरणात ३५.८५ दलघमी जिवंतसाठा असून हे प्रमाण पूर्ण क्षमतेच्या ३.७२ टक्के एवढे आहे. त्यामुळे जिल्ह्यातील धरणेही अजून कोरडीच असल्यात जमा आहेत. मागील आठ दिवसांपासून पावसाचाही पत्ता नाही. ठरावीक दिवशीच अचानक अतिवृष्टी होत असल्याचा फटका शेतकऱ्यांना बसत आहे.
हिंगोली तालुक्यात पारोळा ७, वडद-९, चोरजवळा-१२, सवड-४, पेडगाव ३, हातगाव १९ टक्के भरले आहे. तर हिरडी जोत्याखाली व भाटेगावचा अहवालच नाही. सेनगाव तालुक्यातील सवना व पिंपरी तलाव प्रत्येकी २३ टक्के भरला असून बाभूळगाव व घोडदरी तलाव जोत्याखाली आहेत. औंढा तालुक्यातील मरसूळ ३, औंढा-६, पिंपळदरी तलाव २४ टक्के भरला आहे. तर वाळकी, सुरेगाव, सेंदूरसना, पुरजळ, वंजारवाडी, काकडदाबा, केळी हे तलाव जोत्याखाली आहेत. कळमनुरी तालुक्यातील कळमनुरी, बोथी, दांडेगाव हे तलाव जोत्याखाली असून देवधरी ३ टक्के भरले आहे. वसमत तालुक्यातील राजवाडी तलावही अजून जोत्याखाली आहे. कोल्हापुरी पद्धतीच्या बंधाºयांपैकी चिंचखेडा, खेर्डा, खोलगाडगा, राहटी बंधाºयात १८.३८ टक्के जलसाठा असल्याची नोंद प्रशासनाकडे झाली आहे.