नात्याला काळिमा! पित्याकडून स्वतःच्या अल्पवयीन मुलीवर अत्याचार

By ऑनलाइन लोकमत | Published: October 16, 2024 05:36 PM2024-10-16T17:36:13+5:302024-10-16T17:37:39+5:30

बाप-लेकीच्या नात्याला कलंक लावणाऱ्या घटनेने खळबळ

Abuse of own minor daughter by father in Hingoli's Goregaon | नात्याला काळिमा! पित्याकडून स्वतःच्या अल्पवयीन मुलीवर अत्याचार

नात्याला काळिमा! पित्याकडून स्वतःच्या अल्पवयीन मुलीवर अत्याचार

- दिलीप कावरखे
गोरेगाव (जि. हिंगोली) :
१४ वर्षीय अल्पवयीन मुलगी घरात एकटी पाहून नराधम पित्याने जन्मदात्या मुलीवर अत्याचार केल्याची घटना १५ ऑक्टोबर रोजी हिंगोली जिल्ह्यातील गोरेगाव पोलिस ठाणे हद्दीत घडली. याप्रकरणी गुन्हा दाखल करीत पोलिसांकडून आरोपीला बेड्या ठोकण्यात आल्या आहेत.

१५ ऑक्टोबर रोजी हिंगोली जिल्ह्यातील गोरेगाव पोलिस ठाणे हद्दीतील एका गावात स्वतःच्या १४ वर्षीय मुलीवरच तिच्या पित्याने अत्याचार केल्याची घटना घडली. मंगळवारी सकाळी साडेनऊ वाजेच्या सुमारास आई, आजी, आजोबा, भाऊ मजुरीच्या कामासाठी शेतात गेले होते. यादरम्यान, इयत्ता आठवीमध्ये शिकत असलेली पीडित विद्यार्थिनी डोके दुखत असल्याने शाळेत न जाता आराम करण्यासाठी घरी थांबली होती. दरम्यान, दुपारी अडीच ते तीन वाजेच्या सुमारास वडिलांनी मुलगी घरामध्ये एकटीच पलंगावर झोपली असल्याचे बघून घराचे दोन्ही दरवाजे बंद करून तिच्यावर बळजबरीने अत्याचार केला. यावेळी पप्पा मला सोडा, बाहेर जाऊ द्या, अशी विनंती मुलीने केली. परंतु नराधम पित्याला मुलीची कीव आली नाही.

दरम्यान, पीडितेचा भाऊ शेतातून घरी आला असता त्याने दरवाजा उघडून घरात प्रवेश करीत सदर प्रकार बघितला. यावेळी वडिलास हे काय करता म्हणून विचारले असता, मागील बाजूचा दरवाजा उघडून नराधम पिता पसार झाला. त्यानंतर रात्री पीडित मुलीकडून गोरेगाव पोलिस ठाण्यात तक्रार देण्यात आली. याप्रकरणी मंगळवारी रात्री साडेनऊ वाजेच्या सुमारास गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिस उपनिरीक्षक नितेश लेंगुळे हे तपास करीत आहेत. घटनेचे गांभीर्य जाणून घेत आरोपीचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी पोना. राहुल मैंयकर, विठ्ठल खोकले, सोनाजी रणखांबे आदींचे पथक तयार केले होते.

Web Title: Abuse of own minor daughter by father in Hingoli's Goregaon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.