संचालक खून प्रकरणातील आरोपी फरारच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 8, 2018 11:43 PM2018-01-08T23:43:09+5:302018-01-08T23:43:13+5:30
येथील कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक सर्जेराव पोले खून प्रकरणातील प्रमुख आरोपी फरार झाले असून, अतिशय नियोजनबद्ध पद्धतीने करण्यात आलेल्या या खून प्रकरणातील ३ आरोपींना अटक केली आहे. मुख्य आरोपी फरार झाल्याने आरोपी शोधण्याचे आव्हान पोलिसांंसमोर उभे ठाकले आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
सेनगाव : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक सर्जेराव पोले खून प्रकरणातील प्रमुख आरोपी फरार झाले असून, अतिशय नियोजनबद्ध पद्धतीने करण्यात आलेल्या या खून प्रकरणातील ३ आरोपींना अटक केली आहे. मुख्य आरोपी फरार झाल्याने आरोपी शोधण्याचे आव्हान पोलिसांंसमोर उभे ठाकले आहे.
वडहिवरा येथील माजी पं.स.सदस्य व कृउबा समितीचे संचालक सर्जेराव रामराव पोले (५५) यांचे १ जानेवारीला अपहरण करून निघृ्रणपणे हत्या करण्यात आली. शेतीच्या वादातून सुपारी देवून झालेल्या या हत्येचा सेनगाव पोलिसांनी जलदगतीने तपास लावला. या खून प्रकरणात एकूण ६ आरोपीविरोधात खूनाचा गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
पोलिसांनी या प्रकरणातील मयतावर पाळत ठेवणारा, मारेकºयांना टिप देवून पैसे देणारे रतन हरिभाऊ खटके (रा.रामपुरी ता.पाथरी ह.मु.लिंबाळा हुडी) यासह प्रत्यक्ष कटात सहभागी असलेले विजय देवकर, हरिष मिरेकर (दोघे रा.नाशिक) या तीन आरोपींना अटक करण्यात आली.
या खून प्रकरणातील प्रमुख आरोपी व संचालक पोले यांची सुपारी देणारा हरिभाऊ सातपुते (रा.करंजी ता.जिंतूर ह.मु.नाशिक) यासह शिबूअप्पा पुजारी, इम्रान यमूल (दोघे रा.रा.नाशिक) हे तिघेजण खुनाचा छडा लागल्यानंतर फरार झाले आहेत. अटक करण्यात आलेले आरोपी पोलीस कोठडीत असून, त्यांनी कोठडीदरम्यान या गुन्ह्याची कबुली दिली असल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली. पोले खून प्रकरणातील मुख्य तिन्ही आरोपी फरार झाले असून त्यांना शोधण्याचे आव्हान पोलिसांसमोर उभे ठाकले आहे.
आरोपी राज्याबाहेर फरार, पोलिसांचा संशय
हे आरोपी राज्याबाहेर फरार झाले असल्याचा संशय पोलिसांना आहे. त्या अनुषंगाने पोलीस तपास सुरू आहे. मारेकºयांना मुख्य आरोपी हरिभाऊ सातपुते यांनी किती रुपयाची सुपारी दिली होती, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. या प्रकरणातील आरोपीची संख्या तपासात वाढण्याची शक्यता आहे. आरोपी शोधण्यासाठी तपासचक्रे वेगने फिरविली जात आहेत. आरोपींना लवकर अटक करू, अशी माहिती तपास अधिकारी फौजदार किशोर पोटे यांनी दिली.