लाच प्रकरणातील आरोपींना दोन दिवसांची पोलीस कोठडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 15, 2021 04:31 AM2021-08-15T04:31:00+5:302021-08-15T04:31:00+5:30

सेनगाव तालुक्यातील हत्ता येथील महाकाली विद्यालयाचे प्राचार्य दिलीपकुमार विठ्ठलराव राठोड याने तक्रारदाराच्या भाचाचे जात पडताळणी प्रस्ताव तयार करून त्यावर ...

Accused in bribery case remanded in police custody for two days | लाच प्रकरणातील आरोपींना दोन दिवसांची पोलीस कोठडी

लाच प्रकरणातील आरोपींना दोन दिवसांची पोलीस कोठडी

Next

सेनगाव तालुक्यातील हत्ता येथील महाकाली विद्यालयाचे प्राचार्य दिलीपकुमार विठ्ठलराव राठोड याने तक्रारदाराच्या भाचाचे जात पडताळणी प्रस्ताव तयार करून त्यावर सही करण्यासाठी तसेच हिंगोलीच्या जातपडताळणी कार्यालयातून ओळखीने तक्रारदाराचा भाचा व मुलीचे जात पडताळणी प्रमाणपत्र तयार करून दिल्याचा मोबदला म्हणून दोन हजारांच्या लाचेची मागणी केली होती. लाच देण्याची इच्छा नसल्याने तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार नोंदविली होती. त्यानुसार एसीबीचे पोलीस उपअधीक्षक नीलेश सुरडकर, पोहेकॉ विजय उपरे, पोना तान्हाजी मुंडे, पोना ज्ञानेश्वर पंचलिंगे, पोशि अवि कीर्तनकार, पोना सरनाईक यांच्या पथकाने शुक्रवारी सेनगाव बसस्थानकाजवळील एका मेडिकलमध्ये सापळा लावला होता. यावेळी हनुमान गोरखनाथ रवने (रा. शिंदेफळ) याच्याकडे लाच देण्याचे प्राचार्य राठोड याने तक्रारदारास सांगितले होते. ही रक्कम हनुमान रवने याने स्वीकारत स्वत:जवळ ठेवत लाच स्वीकारण्यास मदत केली. याप्रकरणी सेनगाव पोलीस ठाण्यात दोघांविरुद्ध गुन्हा नोंद झाला होता. शनिवारी दोन्ही आरोपींना न्यायालयासमोर उभे केले असता त्यांना दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आल्याची माहिती पोलीस उपअधीक्षक नीलेश सुरडकर यांनी दिली.

Web Title: Accused in bribery case remanded in police custody for two days

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.