ड्रायडेच्या दिवशी दारुविक्री करणाऱ्यांवर गुन्हा दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 18, 2019 12:55 AM2019-04-18T00:55:44+5:302019-04-18T00:56:51+5:30
लोकसभा निवडणुक कालावधीत बेकायदेशीररीत्या दारूविक्री करणाऱ्यांविरूद्ध स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने १७ एप्रिल रोजी धडक कारवाई केली.
हिंगोली : लोकसभा निवडणुक कालावधीत बेकायदेशीररीत्या दारूविक्री करणाऱ्यांविरूद्ध स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने १७ एप्रिल रोजी धडक कारवाई केली.
हिंगोली तालुक्यातील नर्सी नामदेव परिसरात स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने कारवाई करून १५ हजार ३६० रूपये किंमतीचा अवैध देशी दारूसाठा जप्त केला. याप्रकरणी परवानाधारक देशी दारूविक्री करणाºयांविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी मालाबाई सीताराम जैस्वाल, अमित सीताराम जैस्वाल दोघे रा. सेनगाव यांच्याविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर कारवाई स्थागुशाचे पोनि जगदीश भंडरवार व त्यांच्या पथकातील पोउपनि लंबे, पोहेकॉ बोके, जाधव, राठोड, संभाजी लेकुळे, पंचलिंगे, कुडमेते व सोळंके आदींनी केली. भारत निवडणूक आयोगाने लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-२०१९ च्या कार्यक्रम घोषित केला आहे. त्यानूसार हिंगोली लोकसभा मतदार संघामध्ये १८ एप्रिल रोजी निवडणुक होणार आहे. सदर निवडणुक खुल्या, मुक्त व निर्भय वातावरणात पार पाडण्यासाठी मतदान प्रक्रिया संपण्याच्या वेळेपूर्वीच्या म्हणजेच ४८ तासांमध्ये मद्यविक्री करण्यास मनाई, कोरडा दिवस जाहीर करण्याबाबत तरतूद करण्यात आली आहे. परंतु जिल्ह्यात काही ठिकाणी कायद्याचे उल्लंघन करून मद्यविक्री केली जात असल्याचे समोर आले आहे. पोलिस प्रशासनाकडून बेकायदेशीररीत्या कायद्याचे उल्लंघन करून दारूविक्री करणाºयांविरूद्ध धडक कारवाई करून आरोपींविरूद्ध गुन्हे दाखल केले जात आहेत.