व्यापाऱ्यास लुटणारे आरोपी जेरबंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 18, 2019 12:46 AM2019-02-18T00:46:39+5:302019-02-18T00:46:51+5:30
गोरेगाव पोलीस ठाण्यांतर्गत ३१ जानेवारी रोजी रात्री फिर्यादी संतोष पांडुरंग खांडवे यांच्या फिर्यादीवरून पोलीस ठाण्यात कलम ३९२,३४१,३४ भादंवि प्रमाणे गुुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्यातील आरोपींना स्थागुशाच्या पोलिसांनी जेरबंद केले आहे.
हिंगोली : गोरेगाव पोलीस ठाण्यांतर्गत ३१ जानेवारी रोजी रात्री फिर्यादी संतोष पांडुरंग खांडवे यांच्या फिर्यादीवरून पोलीस ठाण्यात कलम ३९२,३४१,३४ भादंवि प्रमाणे गुुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्यातील आरोपींना स्थागुशाच्या पोलिसांनी जेरबंद केले आहे.
संतोष खांडवे यांच्या वाहनास गोरेगाव ते कनेरगाव जाणाºया रस्त्यावर रात्री मोप गावाजवळ रेल्वे पुलाजवळ सायंकाळी ७.३० वाजण्याच्या सुमारास तीन अज्ञात इसमांनी दुचाकी आडवी लावून अडविले होते. आरोपींनी चाकूचा धाक दाखवून व्यापारी खांडवे यांची पैशाची बॅग ज्यामध्ये एकूण ९७ हजार ३७५ रुपये जबरीने काढून घेऊन पळून गेले होते. सदर गुन्ह्यातील अज्ञात आरोपींचा शोधासाठी स्थानिक गुन्हे शाखा हिंगोली यांनी पोलीस अधीक्षक योगेशकुमार, अप्पर पोलीस अधीक्षक यशवंत काळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोनि जगदीश भंडारवार यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे विशेष पथक नेमले. पथकातील पोहेकॉ बालाजी बोके, गणेश राठोड, पोना संभाजी लकुळे, शैलेश चौधरी, गजानन राठोड, भगवान आडे, ज्ञानेश्वर पंचलिंगे, आशिष उंबरकर, विठ्ठल कोळेकर यांनी गुप्त बातमीदारांकडून शिताफीने माहिती घेत गुन्ह्यातील अज्ञात आरोपींचा शोध लावला. आरोपींना शिताफीने ताब्यात घेऊन गुन्हा उघडकीस आणला.
सदर गुन्ह्यातील चोरीस गेलेल्यापैकी नगदी २१ हजार रुपये व गुन्ह्यात वापरलेली मोटारसायकल क्र. एम.एच.१६ एफ २८११ किमंत १५ हजार रुपये, तीन मोबाईल किंमत ३० हजार असा एकूण ३९ हजार रूपयांचा मुद्देमाल जप्त केला.
आरोपी शिवदास प्रकाश धबाळे (२७, रा.शुक्रवारपेठ वाशिम), लक्ष्मण शंकर खिल्लारे (रा.गोरेगाव) यांना ताब्यात घेऊन पुढील कारवाईसाठी हजर केले असता आरोपींना २० फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली.