खून प्रकरणातील आरोपींना कोठडी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 21, 2018 12:30 AM2018-05-21T00:30:08+5:302018-05-21T00:30:08+5:30
वसमत तालुक्यातील पारवा येथील मुरलीधर कदम यांच्या खून प्रकरणी तिघांविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणातील एका फरार आरोपीला रविवार अटक करण्यात आली. या तिन्ही आरोपींना वसमत सत्र न्यायालयासमोर उभे केले असतास २३ मेपर्यंत पोलीस कोठडी मिळाली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
कुरूंदा : वसमत तालुक्यातील पारवा येथील मुरलीधर कदम यांच्या खून प्रकरणी तिघांविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणातील एका फरार आरोपीला रविवार अटक करण्यात आली. या तिन्ही आरोपींना वसमत सत्र न्यायालयासमोर उभे केले असतास २३ मेपर्यंत पोलीस कोठडी मिळाली आहे.
पारवा येथील मयत मुरलीधर कदम यांचा अनैतिक संबंधातून महिलेने सुपारी देवून खून केला होता. या प्रकरणी तिघांविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. महिला व अन्य एकाला पोलीसांनी शनिवारी ताब्यात घेतले होते. एक फरार आरोपीला रविवारी पकडण्यात आले. गुंतागुंतीचे हे प्रकरण असल्यामुळे आरोपीची संख्या वाढण्याची शक्यता वर्तविण्यात येत होती. खून कशा पद्धतीने झाला? हे देखील स्पष्ट झाले नव्हते. तपासामध्ये या प्रकरणाचा गुंता उलगडणार आहे. या प्रकरणी आरोपी कुंताबाई अडकिणे, विठ्ठल कदम, बालाजी कदम सर्व (रा. पारवा) यांना कुरूंदा पोलीसांनी वसमत सत्र न्यायालयासमोर रविवारी हजर केले असता २३ मेपर्यंत पोलीस कोठडी मिळाली आहे. या प्रकरणाचा अधिक तपास सपोनि शंकर वाघमोडे हे करीत आहेत.