खूनप्रकरणातील आरोपीस अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 10, 2018 12:36 AM2018-10-10T00:36:23+5:302018-10-10T00:36:26+5:30
येथील कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक सर्जेराव पोले खून प्रकरणातील मुख्य फरार आरोपी हरिभाऊ सातपुते (रा.कंरजी ता.जिंतूर) यास सेनगाव पोलिसांनी दहा महिन्यानंतर अटक केली.
लोकमत न्यूज नेटवर्क
सेनगाव : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक सर्जेराव पोले खून प्रकरणातील मुख्य फरार आरोपी हरिभाऊ सातपुते (रा.कंरजी ता.जिंतूर) यास सेनगाव पोलिसांनी दहा महिन्यानंतर अटक केली.
तालुक्यातील वडहिवरा येथील माजी पंचायत समिती सदस्य व बाजार समिती संचालक सर्जेराव पोले (५५) यांचे १ जानेवारी रोजी अपहरण करुण खून करण्यात आला होता. जमिनीच्या वादातून अतिशय शिताफीने सुपारी देवून केलेल्या खुन प्रकरणाचा सेनगाव पोलीसांनी ४८ तासांत उलगडा केला होता. या प्रकरणातील पोलीसांनी रतन हरिभाऊ खटके रा.रामपुरी ता.पाथरी याच्यासह विजय देवकर, हरीष बाबुराव मिरेकर, इम्रान युनूस शेख (सर्व रा.नाशिक) या चार आरोपींना अटक केली होती. खून प्रकरणातील मुख्य आरोपी हरीभाऊ सातपुते, शिबु आप्पा पुजारी (रा.नाशिक) हे खुनाचा उलगड्यानंतरही फरार झाले होते. आरोपी अटकेच्या मागणीसाठी मयत पोले यांच्या नातेवाईकांनी जिल्हाकचेरी समोर उपोषणही केले होते. अखेर मंगळवारी सकाळी पोलीसांच्या शोध मोहिमेला यश आले. गुप्त माहितीवरून मुख्य आरोपी सातपुते यास नांदेड येथील रेल्वे स्टेशनवर सकाळी आठ वाजता सापळा रचून अटक केली. ही कारवाई पोनि सरदारसिंह ठाकूर, सपोउपनि एम.एम.टाले, अनिल भारती आदींनी केली. रतन खटके यास उच्च न्यायालयाने जामीन दिला, तर अन्य एक अल्पवयीन असल्याने त्यास सत्र न्यायालयाने जामीन दिला. दोन्ही आरोपी न्यायालयीन कोठडीत आहेत. एक आरोपी फरारच आहे.