येडशी प्रकरणातील १६ आरोपी अटकेत
By admin | Published: February 12, 2015 01:50 PM2015-02-12T13:50:07+5:302015-02-12T13:50:07+5:30
येडशी /यात्रेतील कुस्त्याच्या दंगलीवेळी पोलिस कर्मचार्यांना झालेल्या मारहाण प्रकरणात ११ फेब्रुवारी रोजी आणखी चार आरोपिंना पोलिसांनी अटक केली आहे.
आखाडा बाळाूपर : /येडशी /यात्रेतील कुस्त्याच्या दंगलीवेळी पोलिस कर्मचार्यांना झालेल्या मारहाण प्रकरणात ११ फेब्रुवारी रोजी आणखी चार आरोपिंना पोलिसांनी अटक केली आहे. प्रथम पाच नंतर सात व बुधवारी चार अशा एकूण १६ आरोपींना आतापर्यंत अटक झाली आहे. या प्रकरणातील सात आरोपी अजूनही फरार आहेत.
कळमनुरी तालुक्यातील येडशी येथील यात्रेच्या कुस्तीच्या दंगलीत १0 जानेवारी रोजी बंदोबस्तावर असलेल्या तीन कर्मचार्यांना मारहाण झाली होती. याप्रकरणी जमादार यादव गोपालराव वाघमारे यांच्या फिर्यादीवरुन २३ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. घटनेच्या दुसर्याच दिवशी पोलिसांनी पाच आरोपींना अटक केली होती. त्यानंतर फरार आरोपींच्या शोधार्थ पोलिसांनी एक महिन्याचा कालावधी घेतला पोलिसांच्या या दीर्घ विo्रातीनंतर ९ फेब्रुवारी रोजी 'दम दार' कार्यवाही करीत गोरख विश्वनाथ यादव, बालाजी ऊर्फ गजानन मारोती कदम, माधव ग्यानबा देवकते, श्याम मोतीराम आवचार, गजानन उर्फ भगवान नानाराव मस्के, उमेश अशोकराव कोकरे, बजरंग शेषराव कोल्हे अशा सात जणांना अटक केली. त्यानंतर ११ फेब्रुवारी २0१५ रोजी सकाळी १0. १५ वाजता भोसी येथील त्यांच्या राहत्या घरुन अरविंद माधव कोकरे, गोविंद संजय कोकरे, सचिन विजय कोकरे, अक्षय उर्फ आकाश विजय कोकरे या चार जणांना अटक केली आहे. या गुन्ह्यात २३ पैकी १६ आरोपींना अटक झाली असून सात आरोपी अद्याप फरार आहेत.
या फरार आरोपींचा लवकरच शोध घेवून त्यांना अटक करण्यात येईल असे सहाय्यक पोलिस निरीक्षक पंडीत कच्छवे यांनी सांगितले. सर्वसामान्यांचे रक्षण करणार्या पोलिसांनाच मारहाण झाल्यानंतरही पोलिसांकडून होत असलेल्या 'दम दार' कार्यवाहीची चर्चा जोरात होत आहे. /(प्रतिनिधी)
■ कळमनुरी तालुक्यातील येडशी येथील यात्रेच्या कुस्तीच्या दंगलीत १0 जानेवारी रोजी बंदोबस्तावर असलेल्या तीन कर्मचार्यांना मारहाण झाली होती.
फरार आरोपींचा लवकरच शोध घेवून त्यांना अटक करण्यात येईल असे सपोनि पंडीत कच्छवे यांनी सांगितले.
४/प्रकरणातील एकूण २३ पैकी १६ जणांना आखाडा बाळापूर पोलिसांनी आतापर्यंत केली अटक
■ जिल्ह्यात मटका, अवैध दारूविक्री, अवैध वाहतूकही फोफावली आहे. मंगळवारी रामलीला मैदानावरून लाखोंचा गुटखा जप्त झाला. काही ठिकाणी खुलेआम गुटखा विक्री होत आहे. याकडे लक्ष देण्याची मागणी होत आहे.