जवळा बाजार येथे १८ वारांगणावर कार्यवाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 11, 2018 01:26 AM2018-04-11T01:26:28+5:302018-04-11T01:26:28+5:30
परभणी रोडवरील सतरामैल परिसरामध्ये कुंटणखाना सुरू असून, मंगळवारी सकाळी १०.३० वाजता हट्टा पोलीस ठाणे व हिंगोली महिला तपास पथकाच्या वतीने १८ महिलांविरूद्ध कार्यवाही करण्यात आली.
लोकमत न्यूज नेटवर्क
जवळा बाजार : परभणी रोडवरील सतरामैल परिसरामध्ये कुंटणखाना सुरू असून, मंगळवारी सकाळी १०.३० वाजता हट्टा पोलीस ठाणे व हिंगोली महिला तपास पथकाच्या वतीने १८ महिलांविरूद्ध कार्यवाही करण्यात आली.
जवळा बाजार येथील परभणी रस्त्यावर चालणाऱ्या कुंटणखान्यावर हट्टा पोलिसांनी अनेकदा कार्यवाही केली आहे. तरीही या ठिकाणी काही महिला हा व्यवसाय करीत आहेत. या ठिकाणी काही महिलांनी कुंटणखाना चालून व्यवसाय सुरू केला आहे. त्यामुळे सोमवारी सकाळी १०.३० वाजता महिलांवर कार्यवाही करण्यात आली. यामध्ये मनीषा पोचटी शिंदे (२५, टोकाई, वसमत), राणी महादेव देवकते (३६, मानवत), शमाबी अफजलखाँ (५०, जवळा बाजार), आशा समद शेरू (२५, डिग्रस, यवतमाळ), स्वाती रवी स्वामी (३५, डिग्रस), नाजेराबी शे. मुज्जू (६०, डिग्रस), सपना दगडू कोकाटे (२५, परभणी), मनीषा संभाजी यादव (२५, परभणी), राणी गणेश शिंदे (२४, परभणी), नागर सुदाम तोंडे (४०, जवळा बाजार), जनाबाई शंकर साखरे (३०, पुसद), लक्ष्मीबाई श्रीकांत भगत (५०, पुसद), राधाबाई धनू चव्हाण (५०, जवळा बाजार), सीमा रतन साबळे (३०, परभणी), सुलोचना केशव भोसले (४०, जवळा बाजार) या महिला दिवसा-रात्री रस्त्यावरून ये-जा करणाºयांसोबत अश्लिल चाळे करताना त्यांना पकडण्यात आले असून दंडात्मक कार्यवाही करून समज देवून सोडण्यात आले आहे.
बुधवारी औंढा येथील न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. तसेच या ठिकाणच्या सर्व महिला कुंटणखाना चालकांना व्यवसाय बंद करण्याची समज देण्यात आली. सदर कार्यवाही हट्ट्याचे सपोनि सुनील नाईक, जमादार शेख खुद्दूस शेख लाल, अंबादास विभुते, अरविंद गजभार, इमरान काजी सह हिंगोलीच्या महिला तपास पथकाच्या जमादार एस.टी.जाधव व व्ही.एन. ढवळे, चालक एफ.एल. डवरे यांनी केली आहे.