विमा नसल्यामुळे ७४ वाहनांवर कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 1, 2021 04:20 AM2021-01-01T04:20:40+5:302021-01-01T04:20:40+5:30
वाहन घेतले की त्याचा विमा काढणे हे वाहनासाठी तसेच वाहन मालकासाठी हे फायद्याचेच असते. काही जण काटकसर म्हणून ...
वाहन घेतले की त्याचा विमा काढणे हे वाहनासाठी तसेच वाहन मालकासाठी हे फायद्याचेच असते. काही जण काटकसर म्हणून जुनी वाहने त्रयस्त व्यक्तीकडून खरेदी करतात. त्याने विमा काढला की नाही याची खातरजमाही करत नाहीत. खरे पाहिले तर जुने वाहन खरेदीच करु नये. जर खरेदी केले तर त्या वाहन मालकाने विमा काढला आहे की नाही हेही पाहणे गरजेचे आहे.
वाहन जुने असो की नवे. लगेच त्याचा विमा काढून आपली सुरक्षितता आबाधीत ठेवावी. कोणती वेळ कधी सांगून येत नाही. स्वत: जोखीम पत्करु नये. सध्या वाहनांची संख्या झपाट्याने वाढत आहे. चैनीपोटी अनेक जण वाहने खरेदी करत आहेत अन् लगेच विकूनही टाकत आहेत. अशावेळी अपघात झाल्यास आपल्याला मदत मिळणे अपेक्षित असते, परंतु, विमा नसल्यामुळे ते मिळणे कठीण होऊन बसते. वाहन खरेदी केले की, लगेच वाहनमालक व संबंधित वाहनाचा विमा काढणे आगत्याचे आहे. यासाठी अनेक वेळा उप प्रादेशिक कार्यालयाने जनजागृतीही केली आहे.
स्वत:च्या संरक्षणासाठी वाहनमालकाने सर्तकता बाळगून आणि पुढील भविष्यासाठी आपल्या वाहनाचा विमा उतरविणे आवश्यक आहे.
एप्रिल ते नोव्हेंबर २०२० या कालावधीत ट्रक, दुचाकी, कार, जीप अशा ७४ वाहनांवर नियमाप्रमाणेच कारवाई केली असल्याचे उप प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या वतीने सांगण्यात आले.
विमा न काढणे फायद्याचेच ठरते
वाहन खरेदी करुन त्याचा विमा न काढणे हे योग्यच नाही. कारण वेळ कधी कुणाला सांगून येत नाही. अपघात झाल्यानंतर बऱ्याच वेळा आपण क्लेम करतो. नुकसान भरपाई मिळेल का? याची विचारणा करतो. तेव्हा मोठी अडचण निर्माण होते. विमा असेल तर आपल्याला क्लेम करता येतो आणि वाहनाची नुकसान भरपाई मिळू शकते.