विनामास्क फिरणाऱ्या १४ जणांवर कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 26, 2021 04:43 AM2021-02-26T04:43:16+5:302021-02-26T04:43:16+5:30
हिंगोली: जिल्ह्यात कोरोनाचे रुग्ण वाढू लागल्याचे पाहून नगरपरिषदेने विनामास्क फिरणाऱ्या शहरात फिरणाऱ्या नागरिकांवर कारवाई करणे सुरू केले आहे. ...
हिंगोली: जिल्ह्यात कोरोनाचे रुग्ण वाढू लागल्याचे पाहून नगरपरिषदेने विनामास्क फिरणाऱ्या शहरात फिरणाऱ्या नागरिकांवर कारवाई करणे सुरू केले आहे. गुरुवारी पथकामार्फत कारवाई करण्यात आली. यात १४ नागरिकांकडून २ हजार २०० रुपयांचा दंड वसूल केला.
मागील दोन-तीन आठवड्यांपासून जिल्ह्यात कोरोनाचे रुग्ण वाढू लागले आहेत. हे पाहून जिल्हा प्रशासनाच्या आदेशन्वये नगर परिषदेने दोन पथकांची नेमणूक केली आहे. सदरील दोन्ही पथक सकाळी १२ ते दुपारी ४ वाजेपर्यंत शहरात विनामास्क फिरणाऱ्या नागरिकांवर कारवाई करीत आहे. गुरुवारी सकाळी १२ ते ४ या वेळात शहरातील गांधी चौक, इंदिरा चौक येथे काम नसताना विनामास्क फिरणाऱ्या १४ नागरिकांवर कारवाई करण्यात आली. मुख्याधिकारी डॉ. अजय कुरवाडे यांच्या मार्गदर्शनाखाली नेमलेल्या पथकामध्ये पथक प्रमुख डी. पी. शिंदे, अमर ठाकूर, पवन खरात, पंडित मस्के, नागेश नरवाडे आदींचा समावेश होता.