ड्राय डेच्या दिवशी दारु विकणाऱ्यांवर कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 16, 2018 12:58 AM2018-04-16T00:58:13+5:302018-04-16T00:58:13+5:30
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त शासनाचा सर्वत्र ड्राय डे असताना अवैध दारु विक्रेत्यांवर हिंगोलीसह चार ठिकाणी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने धाडी टाकून ८ हजार २६० रुपयाची दारु पकडली.
लोकमत न्यूज नेटवर्क
वारंगा फाटा : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त शासनाचा सर्वत्र ड्राय डे असताना अवैध दारु विक्रेत्यांवर हिंगोलीसह चार ठिकाणी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने धाडी टाकून ८ हजार २६० रुपयाची दारु पकडली.
ड्राय डे असताना काही ठिकाणी अवैधरीत्या दारु विक्री होत असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकास मिळाली. यावरून आखाडा बाळापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील येहळेगाव तुकाराम येथील पवनसिंह रघुसिंह ठाकूर (२९) हा आपल्या किराणा दुकानात देशी दारु विकत असताना पोलिसांनी १४४० रुपयांची दारु पकडली तर येथीलच संदीप गोविंद पवार (३५) हा तलाठी भवनाजवळील झोपडीत देशी दारु विकत असताना १८०० रुपयाची दारु पकडली. तसेच वारंगा फाटा येथील जय भवानी ढाब्याच्या पाठीमागे भीमराव बबन लोखंडे (२४, रा. डिग्रस बु) हा देशी व विदेशी दारु विकताना २१४० रुपयाची दारु पकडली. पोलीस नायक विशाल घोळवे, पोहकॉ गणेश राठोड यांच्या फिर्यादीवरून आखाडा बाळापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अन्य एका ठिकाणी हिंगोली शहर येथे रामू पवार हा २८८० रुपयाची अवैध दारु विक्री करत असताना स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी पकडले. सर्व चारही ठिकाणी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक एस.के. केंद्रे, पोहेकॉ विलास सोनवणे, गणेश राठोड, पोना संभाजी लकुळे, विशाल घोळवे, पंचलिंगे, चालक रामजी सुब्रवाड यांच्या पथकाने ही कारवाई केली. स्थानिक गुन्हे शाखेच्या एकाच दिवशी चार ठिकाणी केलेल्या धाडसत्राने अवैध दारु व अवैध व्यावसायिकांचे धाबे दणाणले आहेत. जिल्ह्यात विविध ठिकाणी पोलीस प्रशासना तर्फे कारवाई करण्यात आली.