अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या ४ ट्रॅक्टरवर केली कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 30, 2020 04:39 AM2020-12-30T04:39:57+5:302020-12-30T04:39:57+5:30
औंढा नागनाथ तालुक्यातील वाळू घाटाचे लिलाव न झाल्यामुळे चोरीच्या प्रमाणात वाढ झाली आहे. अवैध वाळू साठा करून त्याची विल्हेवाट ...
औंढा नागनाथ तालुक्यातील वाळू घाटाचे लिलाव न झाल्यामुळे चोरीच्या प्रमाणात वाढ झाली आहे. अवैध वाळू साठा करून त्याची विल्हेवाट लावली जात असल्याची माहिती महसूल विभागाला मिळाली. या माहितीच्या आधारे गत आठवड्यात १३५ ब्रास वाळूसाठा जप्त केला. तसेच शिरडशहापूर ते दोन, पूर येथे एक, बंजारा येथे अवैध वाळूची वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरवर कारवाई करण्यात आली आहे. ही कारवाई उपविभागीय अधिकारी प्रवीण फुलारी, तहसीलदार डॉ. कृष्णा कानगुले यांच्या मार्गदर्शनाखाली नायब तहसीलदार वैजनाथ भालेराव, सचिन जोशी, नीतीश कुलकर्णी, तलाठी विठ्ठल शेळके, संजय पाटील, विजय सोमथकार, विठ्ठल पुरी, राऊत ,अनंत घुगे, संजय मुकिर, सुनील रोडगे, संदीप मुंढे, गणेश जायभाये, कैलास जाधव यांनी केली. कारवाई यशस्वी पार पाडून चारही ट्रॅक्टर जप्त करून पोलीस ठाण्यात लावण्यात आले आहेत.