तक्रार घेण्यास टाळाटाळ करणाऱ्यांवर होणार कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 2, 2021 04:20 AM2021-07-02T04:20:57+5:302021-07-02T04:20:57+5:30
हिंगोली : येथील शहर पोलीस ठाण्यातील कर्मचारी तक्रार घेण्यास टाळाटाळ करीत असल्यास अशा कर्मचाऱ्यांवर कारवाई करणार असल्याची माहिती पोलीस ...
हिंगोली : येथील शहर पोलीस ठाण्यातील कर्मचारी तक्रार घेण्यास टाळाटाळ करीत असल्यास अशा कर्मचाऱ्यांवर कारवाई करणार असल्याची माहिती पोलीस निरीक्षक पंडित कच्छवे यांनी दिली. तशी सूचनाही त्यांनी पोलीस ठाण्याच्या दर्शनीय भागात चिटकविली आहे.
येथील शहर पोलीस ठाण्यातील कर्मचारी कोरोनाचा संसर्ग पसरू नये, कायदा व सुव्यवस्था अबाधित रहावी, यासाठी रात्रंदिवस कर्तव्य बजावित आहेत. शहरातील चार एटीएममध्ये छेडछाड करून रक्कम लांबविणाऱ्या चोरट्यांना दोनच दिवसांत पोलिसांनी जेरबंद केले होते, तसेच पोलीस ठाण्याच्या वतीने रक्तदान शिबिर, गरजूंना मोफत धान्य वाटपासारखे उपक्रमही राबविण्यात आले. आता पोलीस ठाण्यातील कर्मचारी तक्रार घेण्यास विलंब करीत असल्यास अथवा पैशांची मागणी करीत असल्यास अशा कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्याचा इशारा पोलीस निरीक्षक पंडित कच्छवे यांनी दिला आहे. तशी सूचनाही त्यांनी पोलीस ठाण्याच्या दर्शनीय भागात चिटकविली आहे. तक्रार घेण्यास विलंब होत असल्यास अथवा पैशाची मागणी होत असल्यास नागरिकांनी ९०११३२०१०० या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन कच्छवे यांनी केले आहे.
फोटो ३१