सक्रिय मजुरांचे आधार संलग्निकरण मंदगतीने
By admin | Published: November 20, 2014 03:02 PM2014-11-20T15:02:06+5:302014-11-20T15:02:06+5:30
जिल्ह्याचे /सक्रिय मजुरांचे आधारकार्ड संलग्निकरण करण्याची प्रक्रिया मागील काही महिन्यांपासून सुरू आहे. मात्र अजूनही त्याला गती मिळत नसल्याने ते २0 टक्क्यांच्या आसपासच फिरत आहे.
Next
>हिंगोली : /जिल्ह्याचे /सक्रिय मजुरांचे आधारकार्ड संलग्निकरण करण्याची प्रक्रिया मागील काही महिन्यांपासून सुरू आहे. मात्र अजूनही त्याला गती मिळत नसल्याने ते २0 टक्क्यांच्या आसपासच फिरत आहे.
जिल्ह्यातील सर्व सक्रिय मजुरांचे महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेत आधार कार्ड संलग्निकरण करण्याचे आदेश शासनाने दिले आहेत. त्यानुसार नुकत्याच झालेल्या बैठकीत ३0 नोव्हेंबरपर्यंत हे काम पूर्ण करण्यास सांगण्यात आले. आधार कार्ड क्रमांक मिळविण्याचे काम जवळपास ८0 टक्क्यांपेक्षा पुढे गेले आहे.
मात्र अनेक कार्डधारकांची माहिती जुळत नसल्याने १५ ते २0 टक्के कार्डचे सलंगग्निकरण झाले नाही. तर उर्वरित २0 टक्क्यांच्या आसपास मजुरांची माहितीच उपलब्ध नसल्याने त्याचे अपलोडींग करण्याचा प्रश्नच नाही.
या कामाला गती देण्यासाठी सर्व तहसीलदारांना सूचना देण्यात आल्या असल्याचे निवासी उपजिल्हाधिकारी प्रवीण फुलारी यांनी सांगितले. तर लवकरच हे काम ५0 टक्क्यांच्या पुढे नेण्यासाठी अपलोडींगचे काम गतिमान करण्याचा प्रयत्न आहे. सर्व तहसीलचीही त्यासाठी मदत घेतली जाईल. यासाठी ठराविक काळात वेगळी यंत्रणा निर्माण करण्याचा प्रयत्न राहिल, असेही ते म्हणाले. /(जिल्हा प्रतिनिधी)