नवे १६ डॉक्टर मिळताच कोरोनाच्या एका रुग्णालयासह एका केअर सेंटरची भर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 28, 2021 04:32 AM2021-04-28T04:32:19+5:302021-04-28T04:32:19+5:30
९ बीडीएस डॉक्टरांपैकी एक जिल्हा रुग्णालय, २ नवीन कोविड सेंटर औंढा रोड हिंगोली, १ सीसीसी जुने पोलीस अधीक्षक कार्यालय, ...
९ बीडीएस डॉक्टरांपैकी एक जिल्हा रुग्णालय, २ नवीन कोविड सेंटर औंढा रोड हिंगोली, १ सीसीसी जुने पोलीस अधीक्षक कार्यालय, १ आयटीआय वसमत, २ कळमनुरी उपजिल्हा रुग्णालय, १ सिद्धेश्वर व १ कौठा येथे देण्यात आला आहे. जीएनएम अर्थात स्टाफ नर्सपैकी ८ जिल्हा रुग्णालयात तर १ जुने पोलीस अधीक्षक कार्यालय येथे दिली. ४५ आरोग्य सेविकांची नियुक्तीही केली आहे. यात कळमनुरी ५, औंढा रोड कोविड सेंटर ७, कवठा ७, आयटीआय वसमत १०, वसमत उपजिल्हा ४, सिद्धेश्वर ४, जिल्हा रुग्णालय ८ तर कोरोना केअर जुने पोलीस अधीक्षक कार्यालय येथे ३ जणींना नियुक्ती दिली आहे.
जिल्ह्याला अपेक्षित प्रमाणात डॉक्टर उपलब्ध झाले नाहीत. एकही फिजिशियन मिळाला नाही. मात्र जे डॉक्टर मिळाले, त्यावर दोन नवीन संस्थांमध्ये कोरोना रुग्ण दाखल करण्याचा मार्ग मोकळा झाला. तर आधीच असलेल्या रुग्णालयांसह कोरोना केअर सेंटरलाही काही प्रमाणात नवा स्टाफ मिळाला आहे. त्यामुळे रुग्णांच्या नातेवाइकांची कोणी पाहायलाच तयार नसल्याची ओरड आता कमी होईल, असे अपेक्षित आहे. मागील चार ते पाच दिवसांपासून अनेक ठिकाणी ही ओरड दिसून येत आहे. नवीन डॉक्टर, नर्स व आरोग्य सेविका काही प्रमाणात रुजू झाल्या असून आणखी काहींनी रुजू होणे बाकी आहे. त्यामुळे त्यांच्या रुजू झाल्यानंतरच या सेवेतही फरक दिसणार आहे.
जिल्हा प्रशासन अजूनही फिजिशियनच्या प्रतीक्षेत
जिल्हा प्रशासन व आरोग्य विभागाला अजूनही नवे काही फिजिशियन मिळण्याची अपेक्षा आहे. असा कोणी आल्यास त्याला थेट नियुक्ती देण्याची तयारीही जिल्हाधिकाऱ्यांनी यापूर्वीच दर्शविली आहे. जिल्ह्यातीलही कोणी डॉक्टर कोरोना काळात ही सेवा देऊ इच्छित असल्यास त्यांचाही विचार केला जाणार आहे.