आदित्य ठाकरे करणार दुष्काळ पाहणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 15, 2019 12:47 AM2019-01-15T00:47:33+5:302019-01-15T00:47:57+5:30
राज्यातील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांशी संवाद साधण्यासाठी युवसेना प्रमुख आदित्य ठाकरे हे १५ जानेवारी रोजी हिंगोली जिल्हा दौºयावर येणार आहेत. तर पशुपालकांना पशुखाद्याचेही वाटप करण्यात येणार आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
हिंगोली : राज्यातील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांशी संवाद साधण्यासाठी युवसेना प्रमुख आदित्य ठाकरे हे १५ जानेवारी रोजी हिंगोली जिल्हा दौºयावर येणार आहेत. तर पशुपालकांना पशुखाद्याचेही वाटप करण्यात येणार आहे.
यावेळी युवासेना सचिव वरूण सरर्दसाई, सूरज चव्हाण, सिद्धेश कदम, अमोल गीते, पूर्वेश सरनाईक, विप्लव पिंगळे, डॉ. गणेशराजे भोसले, आनंदराव जाधव. आ. बाजोरिया, जयप्रकाश मुंदडा. जिल्हाप्रमुख संतोष बांगर, जि प अध्यक्षा शिवराणी नरवाडे, राजेंद्र शिखरे, दिलीप बांगर, युवा सेनेचे युवा अधिकारी दिलीप घुगे, बाजीराव सवंडकर आदी उपस्थित राहणार आहेत.
हिंगोली येथे सामूहिक विवाह सोहळ्याच्या आयोजनार्थ स्थापन कार्यालयाचे उद्घाटनही युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या हस्ते बाळापूर येथे होणार आहे. आदित्य ठाकरे हे बाळापूर येथे दुपारी १.३0 च्या सुमारास दुष्काळग्रस्त भागातील शेतकºयांच्या जनावरांना पशुखाद्य वाटपास उपस्थित राहणार आहेत. तर तोंडापूर येथे दुपारी ३ वाजता ठाकरे यांच्या हस्ते पशुखाद्याचे वाटप होणार आहे. उपस्थित राहण्याचे आवाहन युवा जिल्हा अधिकारी दिलीप घुगे यांनी केले.