तामिळनाडूच्या धर्तीवर वैद्यकीय शिक्षण अभ्यासक्रमास प्रवेश द्यावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 26, 2021 04:31 AM2021-09-26T04:31:55+5:302021-09-26T04:31:55+5:30
निवेदनात म्हटले की, देशभरात वैद्यकीय शिक्षण अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी नीट परीक्षेचे आयोजन केले जाते; परंतु देशभरात परीक्षेत दिवसेंदिवस गैरप्रकार होत ...
निवेदनात म्हटले की, देशभरात वैद्यकीय शिक्षण अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी नीट परीक्षेचे आयोजन केले जाते; परंतु देशभरात परीक्षेत दिवसेंदिवस गैरप्रकार होत असल्याचे आढळून येत आहेत. राज्य परीक्षा मंडळ व इतर शैक्षणिक अभ्यासक्रमामध्ये तफावत आहे. त्यामुळे राज्यातील ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शहरात येऊन महागडे कोचिंग क्लासेस लावणे परवडत नाही. त्यामुळे सर्वसामान्य कुटुंबातील विद्यार्थ्यांचे डॉक्टर बनण्याचे स्वप्न धुळीस मिळत आहे. राज्य सरकारने तामिळनाडू राज्याप्रमाणे निर्णय घेऊन एचएससी गुणांवर आधारित वैद्यकीय अभ्यासक्रमास प्रवेश द्यावा, अशी मागणी या निवेदनात केली आहे. निवेदनावर युवक काँग्रेसचे विधानसभा अध्यक्ष प्रशांत ऊर्फ बंटी नागरे, एनएसयूआयचे जिल्हाध्यक्ष शेख जुबेर ऊर्फ मामू, तालुकाध्यक्ष विठ्ठल जाधव, अक्षय डाखोरे, अविनाश चव्हाण, संतोष साबळे, सय्यद वसीम आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.