जिल्ह्यात पीककर्जाचा टक्का पुढे सरकेना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 3, 2018 12:46 AM2018-08-03T00:46:14+5:302018-08-03T00:46:28+5:30

पीक कर्ज वाटपात शेतकऱ्यांना चकरा माराव्या लागू नयेत. बँकांनी कर्ज न दिल्यास सक्त कारवाईचे आदेश पालकमंत्र्यांनी दिले होते. मात्र तरीही पीककर्ज १३.९८ टक्केच वाटप झाले असल्याचे दिसून येत आहे. अनेक शेतकरी अजूनही बँकांच्या रांगेतच आहेत.

 Advocate the percentage of crop loan in the district | जिल्ह्यात पीककर्जाचा टक्का पुढे सरकेना

जिल्ह्यात पीककर्जाचा टक्का पुढे सरकेना

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
हिंगोली : पीक कर्ज वाटपात शेतकऱ्यांना चकरा माराव्या लागू नयेत. बँकांनी कर्ज न दिल्यास सक्त कारवाईचे आदेश पालकमंत्र्यांनी दिले होते. मात्र तरीही पीककर्ज १३.९८ टक्केच वाटप झाले असल्याचे दिसून येत आहे. अनेक शेतकरी अजूनही बँकांच्या रांगेतच आहेत.
जिल्ह्यातील विविध राष्टÑीयीकृत बँकेत आजही पीक कर्ज घेण्यासाठी शेतकरी खेटे घेत आहेत. तर बºयाच बँकेतील शाखाधिकारी शेतकºयांचे साधे बोलणेही ऐकायला तयार नसल्याचे चित्र आहे. बहुतांश बँकेत दलालांमार्फत पीककर्ज वाटपाला तेवढा प्रतिसाद मिळाला. त्यातच पीक कर्ज वाटपाच्या कागदपत्र जुळवा - जुळवीत शेतकरी हैराण झाल्याचे पहायला मिळाले. यात मात्र काही केल्या एका फेरीत त्याचे काम होईल याची शाश्वतीच नाही. अनेकदा तर बँकेतील अधिकाºयांची प्रतीक्षा करीत शेतकरी रिकाम्या हाताने परतल्याचीही अनेक उदाहरणे आहेत. त्यातच आता पीककर्ज वाटपाला पीकविम्याची मुदत संपताच अनेकांनी ब्रेक दिला असल्याचेही चित्र आहे. पीकविम्याचा लाभ सोबतच द्यावयाचा असल्याने ही कारणे सांगून काहींनी संचिका थोपवून धरल्या आहेत.
हिंगोली जिल्ह्यात मध्यवर्ती बँकेने १४ हजार ९८२ शेतकºयांना ३१.२0 कोटींचे कर्जवाटप केले. हे प्रमाण २३ टक्के आहे. राष्ट्रीयीकृत व व्यापारी बँकांनी ७ हजार शेतकºयांना ६८.७९ कोटींचे कर्जवाटप केले. या बँकांनी ७२0 कोटींचे कर्जवाटप करावे, असे उद्दिष्ट दिले होते. ते फक्त ९.५६ टक्के पूर्ण केले. तर महाराष्ट्र ग्रामीण बँकेने ४४३५ शेतकºयांना ३४ कोटी वाटले. हे प्रमाण ३३.0५ टक्के आहे.
९५९ कोटींचा लक्षांक असताना बँकांनी केवळ १३४ कोटींचे पीककर्ज वाटले आहे.
जिल्ह्यातील बँकाची पीककर्ज वाटपासाठी नकारघंटा आहे. त्यातच नवीन सभासदांना अद्यापपर्यंत ६९ कोटी ८६ लाख ५७ एवढे कर्ज वाटप केले आहे. यामध्ये जिल्हा मध्यवर्ती बँकेत ७९ शेतकºयांना ११ कोटी ८५ लाख तर व्यापारी बँकाकडून ४ हजार ७०४ शेतकºयांना ४७ कोटी २ लाख तर ग्रामीण बँकेतून ३ हजार १६६ शेतकºयांना २२ कोटी ७१ लाख असे एकूण ७ हजार ९४९ शेतकºयांना ६९ कोटी ८६ लाख ५७ हजार रुपये वाटप करण्यात आलेले आहे.

Web Title:  Advocate the percentage of crop loan in the district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.