हिंगोलीत ४० वर्षांनंतर वर्गमित्रांनी दिला आठवणींना उजाळा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 14, 2021 04:34 AM2021-08-14T04:34:38+5:302021-08-14T04:34:38+5:30
नागपूर येथे १९८६ मध्ये वैद्यकीय महाविद्यालयात शिक्षण घेणाऱ्या सर्व माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा हिंगोलीत नुकताच पार पडला. यावेळी ४० वर्गमित्र ...
नागपूर येथे १९८६ मध्ये वैद्यकीय महाविद्यालयात शिक्षण घेणाऱ्या सर्व माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा हिंगोलीत नुकताच पार पडला.
यावेळी ४० वर्गमित्र विविध ठिकाणावरून हिंगोलीत दाखल झाले होते.
हिंगोलीचे डॉ. संजय कयाल, डॉ. राजेश पवार यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. यावेळी सर्वांनी जुन्या आठवणींना उजाळा दिला. जुन्या आठवणीत रमून गेले होते. डॉ. संजय कयाल, डॉ. राजेश पवार यांनी सर्वांना फेटा बांधून स्वागत केले. तसेच हिंगोली आयएमआयचे अध्यक्ष डॉ. सचिन बागडिया यांनी डॉ .वैभव भानावत यांचे पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला. विशेष म्हणजे स्व. मोहम्मद रफी यांच्या पुण्यतिथीनिमित्त यादे रफी गीत- संगीताचा मधुर गायन सोहळा पार पडला. अनेक डॉक्टर वर्गमित्रांनी विविध गाणे देखील गायले. शायरी ही सादर केली तर काहींनी उत्कृष्ट कविता सादर केल्या.
तसेच घोडसवारी, गिल्ली - दांडा, कंचे आदी खेळांचा आनंद लुटला. स्नेहमिलन सोहळ्यासाठी डॉ. संजय देवतळे,
डॉ. महेश फुलवानी, डॉ. प्रमोद गांधी, डॉ. नितीन अंभोरे, डॉ. अनिल बत्रा, डॉ. बी. के. मुरली, डॉ. संजय अग्रवाल व डॉ. जय नाईक डॉ. प्रशांत रोकडे, डॉ. गणेश जाधव यांच्यासह मुंबई, पुणे, नागपूर, अकोला, बुलडाणा, जळगाव, बीड, लोणार, मेहकर, गडचिरोली, वरोरा, जालना, परळी वैजनाथ, वर्धा, पुसद, यवतमाळ, दिग्रस, मलकापूर येथील वर्गमित्रांनी हजेरी लावली होती.