...अखेर उशिराने का होईना स्वच्छतेस सुरूवात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 5, 2019 12:10 AM2019-01-05T00:10:13+5:302019-01-05T00:11:52+5:30
शहरातील जलेश्वर तलावातील माशांचा अचानक मृत्यू झाल्याची घटना २८ डिसेंबर रोजी घडली होती. त्यामुळे संपूर्ण तलावात मृत माशांचा थर साचला होता.
लोकमत न्यूज नेटवर्क
हिंगोली : शहरातील जलेश्वर तलावातील माशांचा अचानक मृत्यू झाल्याची घटना २८ डिसेंबर रोजी घडली होती. त्यामुळे संपूर्ण तलावात मृत माशांचा थर साचला होता. परिणामी परिसरात दुर्गंधी पसरली. मात्र स्वच्छता लवकर करण्यात आली नसल्याने येथील रहिवाशांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला. उशिराने का होईना अखेर ४ जानेवारीपासून नगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांनी स्वच्छता करण्यास सुरूवात केली आहे.
हिंगोली शहरातील गजबजलेल्या ठिकाणी असलेल्या जलेश्वर तलावातील माशांचा अचानक मृत्यू झाल्याने पसिरातील नागररिकांना अस्वच्छतेचा त्रास सहन करावा लागत आहे. संबधित प्रशासनानेही याकडे दुर्लक्ष केल्याने नागरिकांना अस्वच्छतेचा त्रास सहन करावा लागला. परिणामी येथील नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाल्याने नागरिकांतून संतप्त प्रतिक्रया दिल्या जात आहेत. नगरपालिकेने याकडे लक्ष दिल्याने स्वच्छता विभागाचे कर्मचाºयांनी शुक्रवारपासून साफसफाई करण्यास सुरूवात करण्यात आली. दुर्गंधीमुळे नागरिकांच्या आरोग्य धोक्यात आल्याने तात्काळ स्वच्छता करावी अशी मागणी येथील गणेशअण्णा चौधरी यांनी लोकमत शी बोलताना प्रतिक्रया दिली.
माशांचा मृत्यू कोणीतरी विषारी द्राव्य टाकल्याने झाला या संदर्भाचे निवदेन कंत्राटदार सय्यद नईम स. मुसा यांनी हिंगोली शहर ठाण्याचे पोलीस निरीक्षक यांना दिले होते. नुकसान भरपाईची मागणीही त्यांनी केली.
मृत माशांची दुर्गधी परिसरात पसरल्याने येथील नागरिकांचे आरोग्य धोक्यात सापडले. विशेष म्हणजे पालिकेच्या कर्मचाºयांनी साफसफाईची कामे हाती घेतल्यानंतर तलावातून मुदत संपलेली औषधी व गोळ्या सापडल्या. त्यामुळे आता माशांचा मृत्यू कशामुळे झाला असावा याचा अंदाज लागणे कठीण आहे. प्रशासनाकडून चौकशी केली जात आहे. तलावातील मृत मासे काढण्यास सुरूवात करण्यात आली असली तरी स्वच्छतेचे काम लवकर करण्याची मागणी नागरिकांतून केली जात आहे.