अडीच महिने उलटूनही हरभऱ्याचा निर्णय होईना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 14, 2018 12:46 AM2018-09-14T00:46:07+5:302018-09-14T00:46:32+5:30
येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत फक्त पाच दिवसच नाफेडमार्फत हरभºयाची खरेदी करण्यात आली होती. तालुक्यातील ९७४ शेतकºयांनी हरभरा विक्रीसाठी आॅनलाईन नोंदणी करूनही अद्यापपर्यंत नाफेडमार्फत खरेदी झाली नाही.
लोकमत न्यूज नेटवर्क
कळमनुरी : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत फक्त पाच दिवसच नाफेडमार्फत हरभºयाची खरेदी करण्यात आली होती. तालुक्यातील ९७४ शेतकºयांनी हरभरा विक्रीसाठी आॅनलाईन नोंदणी करूनही अद्यापपर्यंत नाफेडमार्फत खरेदी झाली नाही.
जून महिन्यात फक्त पाचच दिवस नाफेडमार्फत येथील बाजार समितीने ५६ शेतकºयांच्या हरभºयाची खरेदी केली. त्यापैकी ५२ शेतकºयांना त्याची हरभरा विक्रीनंतरची रक्कम आॅनलाईन मिळालेली आहे. परंतु ४ शेतकºयांना ती मिळालेली नाही. हे शेतकरी बाजार समितीत चकरा मारत आहेत. बाजार समितीत हरभरा ठेवण्यासाठी जागा नसल्याने नाफेडमार्फत हरभरा खरेदी केली नाही. शेतकºयांच्या रेट्यानंतर जून महिन्यात फक्त ५ दिवसच खरेदी केली. २९ जूनपर्यंत ५६ शेतकºयांचा हरभरा खरेदी केला. हजारो क्विंटल हरभºयाला ४४०० रुपये हमीभाव देण्यात आला. शेतकºयांचा प्रतिहेक्टरी १० क्विंटल हरभरा खरेदी करण्याचे निर्देश होते. आॅनलाईन अर्ज केलेल्या शेतकºयांचाच हरभरा खरेदी करण्यात आला. आॅनलाईन नोंदणी केलेल्या काही शेतकºयांचा सोयाबीन अजूनही नाफेडने खरेदी केलेला नाही. बाजारात जास्त भाव असल्याने काही शेतकºयांनी नाफेडला सोयाबीन देण्याचे टाळल्याचे बाजार समितीचे सचिव बी.एम. जाधव यांनी सांगितले.
आॅनलाईन : नोंदणी होऊनही खरेदी नाही
कळमनुरी येथील नाफेड केंद्रात हरभरा विक्रीसाठी ९७४ शेतकºयांनी नाफेडकडे आॅनलाईन नोंदणी केली. अडीच महिन्याचा कालावधी झाला तरी नाफेडने त्यांच्या हरभºयाची खरेदी केली नाही. ३० जूनपासून हरभरा खरेदी बंद करण्याचे आदेश बाजार समितीला शासनाने दिल्यानंतर पुढे बाजार
समितीने हरभरा खरेदी बंद केली होती. त्यामुळे ९७४ शेतकºयांना आपला हरभरा विक्री करताना आला नाही. यामुळे शेतकरी आर्थिक कोंडीत सापडला असून नोंदणी झालेले सर्वच शेतकरी नाफेड केंद्रावर रोष व्यक्त करत असल्याचे चित्र दिसत आहे.
बाजार समितीकडे हरभरा ठेवण्यासाठी जागा नसल्याने नाफेडमार्फत हरभरा खरेदी झाली नाही. शासनाकडूनच खरेदी बंद झाली होती, असे बाजार समितीचे सचिव बी.एम. जाधव यांनी सांगितले.
मी नाफेड केंद्रावर १२ एप्रिल रोजी १३ क्विंटल तूर विक्री केली. जवळाबाजार येथील नाफेड केंद्रावर चकरा मारून हैराण झालो आहे. या केंद्राची मी जिल्हाधिकाºयाकडे तक्रार केली तरी काहीच कार्यवाही होत नाही. असे माणिकराव नागरे या शेतकºयाने सांगितले.
पाच महिने झाले तरीही तुरीचे चुकारे मिळेनात
जवळा बाजार- औंढा नागनाथ तालुक्यातील जवळाबाजार येथील नाफेडच्या हमीभाव केंद्रावर तूर विक्री करणाºया शेतकºयांना अजूनही चुकारे मिळाले नाहीत. त्यामुळे या केंद्रावर शेतकरी चकरा मारून हैराण झाले आहेत. या शासनाच्या आधारातून किंमतीनुसार नाफेड खरेदी केंद्र सुरू झाले. या ठिकाणी २३७० शेतकºयांनी आॅनलाईन नोंदणी केली. त्यामध्ये १५ मे रोजी १५३९ शेतकºयाची १४९० तुर खरेदी झाली होती. मात्र आॅनलाईनमुळे अनेक शेतकºयांना अद्यापही पैसे मिळाले नाहीत. फेबु्रवारी, एप्रिल या महिन्यात विक्री केलेल्या तूर उत्पादक शेतकºयांना पाच महिने उलटले तरीही चुकारे मिळाले नाहीत. त्यामुळे शेतकरी जवळाबाजार येथील खरेदी-विक्री संघाच्या कार्यालयात चकरा मारीत आहेत. तर त्यामुळे शिल्लक तुरीचे अनुदान कधी मिळणार असा प्रश्न शेतकºयांमधून विचारला जात आहे.