आठवड्यानंतर हिंगोली जिल्ह्यात बस सेवा सुरु
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 1, 2018 12:26 AM2018-08-01T00:26:04+5:302018-08-01T00:27:13+5:30
सात दिवसाच्या प्रतीक्षेनंतर बस सेवा सुरु झाल्याने हिंगोली जिल्ह्यात मागील आठ दिवसांपासून मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी सुरु असलेल्या मोर्चा मुळे हिंगोली, वसमत, कळमनुरी येथून एकही बस धावली नाही. त्यामुळे प्रत्येक आगाराचे जवळपास ३० ते ३५ लाखांचे नुकसान झाले आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
हिंगोली : राज्यभर मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी सकल मराठा समाजाच्यावतीने आंदोलन करण्यात आले होते. तर अनेक ठिकाणी बसेस पेटवून दिल्या तर कुठे फोडल्या त्यामुळे आगरातून सात दिवसांपासून बसेस सोडण्यात आल्या नव्हत्या. परिणामी, प्रवाशांची गैरसोय निर्माण झाली होती. याच काळात तर खाजगी वाहन धारकांनी मनमानी टिकट आकारुन प्रवाशांची एक प्रकारची लुटच केली होती. सात दिवसाच्या प्रतीक्षेनंतर बस सेवा सुरु झाल्याने हिंगोली जिल्ह्यात मागील आठ दिवसांपासून मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी सुरु असलेल्या मोर्चा मुळे हिंगोली, वसमत, कळमनुरी येथून एकही बस धावली नाही. त्यामुळे प्रत्येक आगाराचे जवळपास ३० ते ३५ लाखांचे नुकसान झाले आहे.
मंगळवारी हिंगोली आगारातून ८ बसेस सोडण्यात आल्या होत्या तर कळमनुरी आगारातून ४ आणि वसमत आगारातून दोन दिवसांपासून बसेस सोडण्यात येत आहेत. एकंदरीत सात दिवसांच्या प्रतीक्षेनंतर प्रवाशांची व विद्यार्थ्यांची गैरसोय टळण्यास मदत झाली होती. अजूनही बस चालकांसह वाकामध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. या कालावधीत मात्र खाजगी वाहन चालकांने जिल्ह्यातील परिस्थितीचा आढावा घेतल्यानंतरच आगारामधून बस बाहेर घेऊन जात आहेत. काही प्रमाणात जिल्ह्यात शांत वातावरण झाल्यामुळे तरी कुठे प्रवाशांची होणारी गैरसोय टळण्यास मदत झाली आहे. तर अजूनही बऱ्याच गावात रास्ता रोको सुरु असल्याचे चित्र आहे.
---
वसमत : दोन दिवसांपासून बस सुरु
गेल्या आठ दिवसांपासून विस्कळीत झालेली एस.टी. वाहतूक हळूहळू पुर्णपदावर येत आहे. वसमत आगाराने गेल्या दोन दिवसांपासून ठराविक मार्गावर बस सोडल्या आहेत. तर मंगळवारी नांदेड, परभणी रस्त्यावरील सर्व गाड्या सोडल्यामुळे प्रवाशांना दिलासा मिळाला. मराठा आरक्षण मागणीसाठी आंदोलन सुरु असल्याने एस.टी. वाहतूक बंद होती. वसमत आगारातून तब्बल पाच दिवस एकही बस बाहेर पडली नव्हती. प्रवाशी विद्यार्थ्यांना त्याचा फटका बसला. दोन दिवसांपासून वसमत आगारातून ठरावीक फेºया सोडणे सुरू केले.