लेखी आश्वासनानंतर उपोषण सुटले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 26, 2018 12:39 AM2018-08-26T00:39:10+5:302018-08-26T00:39:29+5:30
येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर कळमनुरी तालुक्यातील वाकोडी येथील ग्रामस्थ गायरान जमिनीतील अतिक्रमण नियमानुकूल करण्याच्या मागणीसाठी उपोषणाला बसले होते. आ. डॉ. टारफे व अजित मगर यांनी प्रशासन व उपोषणकर्ते यांच्यात मध्यस्ती केली. जि.प.च्या उपमुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी कारवाई करण्याचे लेखी आश्वासन दिल्यानंतर उपोषणाची सांगता करण्यात आली.
लोकमत न्यूज नेटवर्क
हिंगोली : येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर कळमनुरी तालुक्यातील वाकोडी येथील ग्रामस्थ गायरान जमिनीतील अतिक्रमण नियमानुकूल करण्याच्या मागणीसाठी उपोषणाला बसले होते. आ. डॉ. टारफे व अजित मगर यांनी प्रशासन व उपोषणकर्ते यांच्यात मध्यस्ती केली. जि.प.च्या उपमुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी कारवाई करण्याचे लेखी आश्वासन दिल्यानंतर उपोषणाची सांगता करण्यात आली.
कळमनुरी तालुक्यातील वाकोडी येथील गायरान सर्वे नं. १३० मधील २०० निवासी अतिक्रमण नियमानुकूल करावे, या मागणीसाठी ग्रामस्थांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण सुरू केले होते. गेल्या अनेक वर्षापासून सदर गायरान जमिनीमध्ये लोकांनी वास्तव्य सुरू केले आहे. तेथे सर्व प्रकारच्या सुविधाही उपलब्ध करून दिल्या आहेत. ही अतिक्रमणे नियमीत करण्याच्या मागणीसाठी जवळपास १०० नागरिकांनी उपोषण सुरू केले होते. उपोषणकर्ते आणि प्रशासन यांच्यामध्ये आ. डॉ. टारफे, अजित मगर, डॉ. सतीष पाचपुते यांनी मध्यस्थी केली. त्यानंतर जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी यांनी लेखी आश्वासन देवून शासन निर्णय या प्रमाणे पुढील आवश्यक ती कारवाई पुर्ण करणे बाबत कळमनुरी पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी यांना आदेशित केले असल्याचे लेखी पत्र दिल्यानंतर उपोषणाची सांगता करण्यात आली.