हिंगोलीत येथे पँथर ग्रुपच्या वतीने धरणे आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 13, 2018 05:28 PM2018-08-13T17:28:10+5:302018-08-13T17:29:21+5:30
दिल्ली येथे भारतीय संविधानाची प्रत जाळून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विरुद्ध अपशब्द वापरून घोषणाबाजी केल्याची घटना घडली. यातील आरोपींवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करून त्यांना फाशीची शिक्षा द्यावी. या मागणीसाठी पँथर ग्रुपच्यावतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आज सकाळी धरणे आंदोलन करण्यात आले.
हिंगोली : दिल्ली येथे भारतीय संविधानाची प्रत जाळून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विरुद्ध अपशब्द वापरून घोषणाबाजी केल्याची घटना घडली. यातील आरोपींवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करून त्यांना फाशीची शिक्षा द्यावी. या मागणीसाठी पँथर ग्रुपच्यावतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आज सकाळी धरणे आंदोलन करण्यात आले.
याबाबत जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. निवदेनावर संघटनेचे प्रमुख राहुल खिल्लारे, उपाध्यक्ष राहुल पुंडगे, जिल्हाध्यक्ष अक्षय इंगोले, जिल्हा उपाध्यक्ष धम्मानंद भूकतर, संघटक विकी भालेराव, स्वप्नील दिपके, सम्राट लोणकर, भिमराव वाढवे, देवा बनसोडे अविनाश इंगोले, सोहेल सय्यद आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.