औंढा तहसीलच्या प्रांगणातच हाणामारी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 23, 2018 12:16 AM2018-01-23T00:16:20+5:302018-01-23T00:16:23+5:30
जमिनीच्या जुन्या वादातून तहसीलच्या प्रांगणात चौकशीसाठी आलेल्या दोन गटांत फिल्मीस्टाईलने मारहाण झाल्याची घटना २२ जानेवारी रोजी दुपारी २.३० वाजता घडली. यात चार गंभीर जखमी झाले असून, पोलिसांनीच त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
औंढा नागनाथ : जमिनीच्या जुन्या वादातून तहसीलच्या प्रांगणात चौकशीसाठी आलेल्या दोन गटांत फिल्मीस्टाईलने मारहाण झाल्याची घटना २२ जानेवारी रोजी दुपारी २.३० वाजता घडली. यात चार गंभीर जखमी झाले असून, पोलिसांनीच त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले आहे.
औंढा ना. तालुक्यातील रांजाळा येथील दिनाजी श्रीखंडे, राजू दिनाजी श्रीखंडे, गजानन श्रीखंडे, माया दिनाजी श्रीखंडे, कावेरी श्रीखंडे हे त्यांचा गट क्र. २१४ व गट क्र. ५३ या जमिनीचा वाद अनेक दिवसांपासून सुरू आहे. जुलै महिन्यात हट्टा पोलिसांनी जमिनीवरून सतत वाद होत असल्याने ही जमीन शासनाच्या ताब्यात घेण्याचा अहवाल तहसीलदारांना दिला होता.
त्यानुसार सुनावणीसाठी सोमवारी दोन्ही गटांना चौकशीसाठी तहसील कार्यालयात दुपारी ४ वाजता बोलाविले होते; परंतु तत्पूर्वीच सुरूवातीला १ च्या सुमारास किरकोळ बाचाबाची झाली. नंतर दुपारी २.३० वाजता थेट हाणामारीत झाली. यात आरोपींनी चैन, काठ्या, कोयते व कुºहाडीचा वापर करून चौघांना गंभीर केले. तसेच पायाला मुरगाळून पायच निकामी करण्याचा प्रयत्न केला.
हा सर्व प्रकार पाहण्यासाठी गर्दी झाली होती. मात्र भांडण सोडविण्यास कुणीही समोर आले नाही. शेवटी महसूल प्रशासनानेच पुढाकार घेऊन पोलिसांना पाचारण केले होते. त्यानंतर पुढील प्रक्रिया उशिरापर्यंत सुरू होती. कावेरीबाई श्रीखंडे यांच्या फिर्यादीवरून चक्रधर वैद्य, आकाश वैद्य, ज्ञानेश्वर आल्हाट या तिघांविरूद्ध अॅट्रोसिटी अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जखमींना उपचारासाठी रूग्णालयात पाठविण्यात आले आहे.