कृषी प्रदर्शनीतून मिळतेय रोज शेतीविषयक माहिती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 19, 2018 12:11 AM2018-02-19T00:11:41+5:302018-02-19T00:11:45+5:30
महाराष्टÑ शासनाच्या कृषी विभाग, कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा यांच्या संयुक्त विद्यमाने घेतलेल्या जिल्हा कृषी महोत्सव व कयाधू बचत गटांचे प्रदर्शन व विक्री सेंद्रिय शेतीमाल व खरेदीदार विक्रेता संमेलनात शेतीपासून ते घरातील साहित्य आणि खाद्य पदार्थाचे स्टॉल प्रदर्शनीत थाटल्याने येथे येणाºयांना रोजच नव- नविन माहिती मिळण्यास मदत होत आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
हिंगोली : महाराष्टÑ शासनाच्या कृषी विभाग, कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा यांच्या संयुक्त विद्यमाने घेतलेल्या जिल्हा कृषी महोत्सव व कयाधू बचत गटांचे प्रदर्शन व विक्री सेंद्रिय शेतीमाल व खरेदीदार विक्रेता संमेलनात शेतीपासून ते घरातील साहित्य आणि खाद्य पदार्थाचे स्टॉल प्रदर्शनीत थाटल्याने येथे येणाºयांना रोजच नव- नविन माहिती मिळण्यास मदत होत आहे.
प्रदर्शनीमध्ये एकूण २१० स्टॉल उभारण्यात आले आहेत. प्रत्येक स्टॉलवर विविध प्रकारची माहिती व साहित्य विक्रीस ठेवण्यात आल्यामुळे खरोखरच शेती अगदी सोप्या पद्धतीने कशी करता येईल? याची सखोल माहिती मिळत आहे. एवढेच नव्हे तर विविध प्रकारचे बी- बियाण्यासह आधुनिक पद्धतीने करावयाच्या शेतीसाठी लागणारे तंत्रही शेतकºयांचे आकर्षण ठरत आहेत. तसेच डीआरडीचे एकूण ४० बचत गटाचे स्टॉल असून त्यावर विविध खाद्य पदार्थ, डाळ, कपडे, शिवनकाम आदी प्रकारचे साहित्य विक्रीस ठेवले आहे. त्याच्या खरेदीला ग्राहक पंसती देत आहेत. तर बचत गटाच्या महिलांनी सुरु केलेल्या झुणका भाकरीचा अस्वाद घेण्यासाठीही शेतकºयांसह नागरिकांची एकच गर्दी होत आहे. तर विविध प्रकारचे कपडे, घरात वापरण्यासाठी इलेक्ट्रॉनिकच्या वस्तू, विविध युग पुरुषांच्या मूर्ती आदी साहित्य ग्राहकांचे आकर्षण ठरत आहे. तर डॉ. नितीन मार्कंडे यांनी पशुधन व्यवस्थापन शाश्वत शेतीची गुरुकिल्ली यावर मार्गदर्शन केले.
ज्योतीषाची भुरळ
४प्रदर्शनीत तांत्रीक पद्धतीने शेती करण्यासाठी विविध यंत्रसामृगी ठेवलेली असली तरीही येथेही अंधश्रद्धा दिसून आलीच. चक्क येथे जोतीषाने स्टॉल उभारुन आपल्या बोलीभाषेने शेतकºयावर भुरळ टाकल्यामुळे अंद्धश्रद्धेची चर्चा रंगत होती.