जिल्ह्यातील सर्वच एटीएम यंत्रे निर्धन !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 4, 2018 12:22 AM2018-04-04T00:22:21+5:302018-04-04T00:22:21+5:30
बँकाना सलग सुट्यां आणि मार्चएण्डची कामे असल्यामुळे एटीएममध्ये कॅश भरणा झाली नाही. ३१ मार्च रोजी काही एटीएम मशिनमध्ये कॅश होती. मात्र त्यानंतर जिल्ह्यातील सर्वच एटीएममध्ये ठणठणाट होता. त्यामुळे एटीएम कार्डधारकांची धावपळ झाली.
लोकमत न्यूज नेटवर्क
हिंगोली : बँकाना सलग सुट्यां आणि मार्चएण्डची कामे असल्यामुळे एटीएममध्ये कॅश भरणा झाली नाही. ३१ मार्च रोजी काही एटीएम मशिनमध्ये कॅश होती. मात्र त्यानंतर जिल्ह्यातील सर्वच एटीएममध्ये ठणठणाट होता. त्यामुळे एटीएम कार्डधारकांची धावपळ झाली.
ऐन लग्नसराई अन् त्यात एटीएम मशिनमध्ये कॅश नसल्याने वधू-वराकडील मंडळीची पैसे काढण्यासाठी धावपळ होत आहे. हिंगोली शहरातील एटीएम मशिनची संख्या वाढली तरी कॅशची समस्या अद्याप तशीच आहे. वेळेवर मशिनमध्ये पैसे भरले जात नसल्याने मात्र एटीएमधारकांना अनेक अडचणींना तोंड द्यावे लागत आहे. विशेष म्हणजे मंगळवारी हिंगोलीचा बाजार असतो. त्यातच सध्या लग्नसराई असल्याने अनेकांना लग्नसाहित्य खरेदी करावी लागते. परंतु मशिनमध्ये पैसे नसल्याने अनेकांना मंगळवारी खाली हात परतावे लागले. त्यामुळे ऐनवेळी कार्डधारकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. एसबीआय बँकेकडे मोजकीच कॅश येत आहे. त्यामुळे इतर एटीएमच्या शाखांतही पैसे कमी भरले जात आहेत. त्यामुळे काही दिवसांतच एटीएम रिकामे होत आहे. त्यात सध्या लग्नसराईमुळे खरेदी करणाऱ्यांची संख्या जास्त असल्याने एटीएम समोर पैसे काढण्यासाठी गर्दी होत आहे. परंतु मशिनमध्ये कॅश नसल्याने अनेक ग्राहकांना रिकाम्या हाताने परतावे लागत असल्याचे दिसून आले. त्यामुळे खातेदार वैतागले होते.
दोन दिवसांत एटीएम मशिनमध्ये कॅश भरणा केली जाणार असल्याचे विविध बँकेच्या शाखाधिकाºयांनी ‘लोकमत’ शी बोलताना सांगितले.
एटीएम मशिनद्वारे पैसे काढणाºयांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. त्यातच एसबीआय शाखेकडे मोजकीच कॅश दिली जात आहे. त्यामुळे एटीएम मशिनमधील रोकड लवकर संपते. असे एसबीआय बँक शाखा व्यवस्थापक दिनेश चंद्राकर यांनी लोकमत शी बोलताना सांगितले. तर बँकांना सलग सुट्या व मार्चएण्डची कामे यामुळे कॅशचा तुटवडा आहे. एटीएम मशिनमध्ये रोकड नसल्याचे सर्वत्रच असे चित्र आहे. कॅश उपलब्ध होताच मशिनमध्ये रोकड जमा केली जाईल असे शाखा व्यवस्थापक जयबीर सिंह यांनी सांगितले.