तेरीभी चूप, मेरीभी चूप... पासिंग रॅकेट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 4, 2018 11:53 PM2018-03-04T23:53:58+5:302018-03-04T23:54:01+5:30

तालुक्यातील इयत्ता दहावीची एकूण ३३४६ विद्यार्थी परिक्षा देत असून, त्यातील २५ टक्के विद्यार्थी हे फक्त कापड सिनगी येथील संशयाच्या भोवºयात सापडलेल्या दोन विद्यालयात प्रवेशित आहेत.

 All the squats, my face ... passing rackets | तेरीभी चूप, मेरीभी चूप... पासिंग रॅकेट

तेरीभी चूप, मेरीभी चूप... पासिंग रॅकेट

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
सेनगाव : तालुक्यातील इयत्ता दहावीची एकूण ३३४६ विद्यार्थी परिक्षा देत असून, त्यातील २५ टक्के विद्यार्थी हे फक्त कापड सिनगी येथील संशयाच्या भोवºयात सापडलेल्या दोन विद्यालयात प्रवेशित आहेत. जवळपास सर्व विद्यार्थी मराठवाड्याच्या विविध जिल्ह्यातील आहेत. अशा स्थितीत या दोन्ही शाळेत परिक्षेपूर्वी होणारी प्रात्यक्षिक व अंतर्गत परीक्षाही झाली नसल्याचा गंभीर प्रकार समोर आल्याने पासिंग रॅकेटचे संशय व्यक्त केला जात आहे.
सेनगाव तालुक्यात एका विद्यालयात सर्व सोयी सुविधा देवूनही विद्यालयात दहावीचे जेमतेम ५० ते १०० विद्यार्थी आजपर्यंत प्रवेशित झाले. परंतु कोणतीही सुविधा नसताना दुर्गम भागातील कापडसिनगी येथील रेखेबाबा विद्यालय व गजानन माध्यमिक विद्यालयात दहावीचे एकूण ७०० विद्यार्थी प्रवेशित असल्याचा प्रकार चव्हाट्यावर आल्याने या प्रकरणाचे गांभीर्य वाढत आहे. एकावेळी १०० विद्यार्थी या दोन्ही विद्यालयात बसण्याची आसन व्यवस्था नाही, खोल्या नाहीत, एका विद्यालयाचा कारभार नावाचा पाटीवर चालू आहे. अशा परिस्थितीत केवळ एका वर्गात एवढ्या मोठ्या प्रमाणात अन् तेही बाहेर जिल्ह्यातील विद्यार्थी या दोन विद्यालयात प्रवेशित झाल्याने हा प्रकार पासिंग रॅकेटशी संबंधित असल्याचा संशय व्यक्त होत आहे. सदर प्रकाराची आपल्याला माहिती नाही. अचानक विद्यार्थी परीक्षेसाठी वाढल्यानंतर हा प्रकार आम्हाला माहिती झाली असा दावा जिल्हा व तालुका शिक्षण विभाग करीत आपली बाजू झटकून देण्याचा प्रयत्न करीत आहेत. असे असले तरी शिक्षण विभागाच्या मूक संमतीनेच हा प्रकार घडला आहे. या प्रकारामुळे तालुक्यातील शिक्षण व्यवस्था मात्र बदनाम होत आहे. असे असताना या प्रकरणाचे गांभिर्य तपासायला शिक्षण विभाग तयार नाही. माध्यमिक शिक्षणाधिकारी दीपक चवणे यांनी या दोन्ही शाळेला भेटी दिल्यानंतर या विद्यालयातील सर्व प्रवेश विद्यार्थ्यांचे अनियमिततेने झाले असल्याचा संशय निर्माण झाला आहे. अत्यंत गंभीर असणाºया या प्रकरणात या ७०० विद्यार्थ्यांच्या प्रवेशाचे कोणतेही अभिलेखे अद्यापपर्यंत शिक्षण विभागाने तपासले नाहीत. शिवाय शालांत प्रमाणपत्र परीक्षेपूर्वी या दोन्ही विद्यालयात २८ फेब्रुवारीपूर्वी प्रात्यक्षिक व अंतर्गत परीक्षा होणे गरजेचे होते. या परीक्षेकरिता बाह्य पाहणी परीक्षकांची परीक्षा बोर्ड नियुक्ती करते; परंतु या विद्यालयांत अद्यापपर्यंत या दोन्ही परीक्षाही घेण्यात आल्या नाहीत.
या संपूर्ण प्रकरणाचे व प्रवेशित विद्यार्थ्यांचे परभणी कनेक्शन असून, पासिंग रॅकेटशी या प्रकरणाचा संबंध असण्याची दाट शक्यता आहे. शिवाय शिक्षण विभागातील वरिष्ठ अधिकारी या प्रकरणाला कानाडोळा करीत असल्याने या प्रकरणाची व्याप्ती वाढण्याची शक्यता आहे.
तालुक्यात ३९ माध्यमिक शाळेत दहावीचे एकूण ३३४६ विद्यार्थी आहेत. त्यात ८ शाळा जि.प.च्या तर ३१ शाळा खाजगी संस्था आहेत. ३७ शाळेत २६५२ विद्यार्थी तर, कापडसिनगी येथे तब्बल ६९४ दहावी परीक्षेला बसलेत. दहावीच्याच रेकॉर्ड ब्रेक संख्येमुळे तालुक्याचा दहावीचा निकाल घसरला तर नवल वाटणार नाही.
चौकशीची मागणी
४सदर प्रकार दहावी पासिंग रॅकेटशी संबंधित अनेक विद्यार्थ्यांना दहावी पासचे आमिष देऊन लाखो रुपये उकळले आहेत, असा आरोप शिवसेनेचे जिल्हा उपप्रमुख संदेश देशमुख यांनी केला असून या संबंधी आपण या प्रकरणात दोन्ही शाळेच्या प्रवेशाची चौकशी करावी, अशी मागणी जिल्हाधिकाºयांकडे निवेदनाद्वारे केली आहे, अशी माहिती देशमुख यांनी दिली.

Web Title:  All the squats, my face ... passing rackets

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.