१०० लाभार्थ्यांना गॅस सिलिंडरचे वाटप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 27, 2019 01:18 AM2019-08-27T01:18:34+5:302019-08-27T01:19:10+5:30
सेनगाव तालुक्यातील धनगरवाडी येथे आ.तान्हाजी मुटकुळे यांच्या हस्ते उज्ज्वला गॅस योजनेत जवळपास १00 लाभार्थ्यांना गॅस सिलिंडरचे वाटप करण्यात आले.
लोकमत न्यूज नेटवर्क
हिंगोली : सेनगाव तालुक्यातील धनगरवाडी येथे आ.तान्हाजी मुटकुळे यांच्या हस्ते उज्ज्वला गॅस योजनेत जवळपास १00 लाभार्थ्यांना गॅस सिलिंडरचे वाटप करण्यात आले.
या कार्यक्रमास भाजपचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य रामरतन शिंदे, हिंगोली बाजार समितीचे संचालक प्रशांत सोनी, शंकर कोरडे, किसन कोरडे, कुंडलिक तिडके रतन जगताप, विलास जाधव, वसंत रवणे आदींची उपस्थिती होती. यावेळी आ.मुटकुळे म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी माता-भगिनींच्या डोळ्यांतील अश्रू पुसण्याचे काम प्रधानमंत्री उज्ज्वला गॅस योजनेच्या माध्यमातून केले आहे. या योजनेमुळे चुलीवर धुराचा त्रास सोसत स्वयंपाक करण्याची महिलांवरील वेळ टळणार आहे. शिवाय घरपोच गॅस सिलिंडर आणून दिले आहे. यापूर्वी रांगा लागूनही गॅस सिलिंडर मिळायचे नाही. सामान्यातील सामान्य माणसालाही सर्व सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी शासन प्रयत्न करीत आहेत. या भागातील शेतकऱ्यांना आगामी काळात सिंचनाचा अनुशेष दूर झाल्यानंतर चांगले दिवस येतील, असेही ते म्हणाले.