ऑफलाइन धान्य वितरणास परवानगी द्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 25, 2021 04:25 AM2021-07-25T04:25:16+5:302021-07-25T04:25:16+5:30
निवेदनात म्हटले की, जुलै २०२१ महिन्याचे अद्याप ऑनलाइन स्टॉक प्राप्त झालेला नाही. त्यामुळे ई-पॉस मशीनद्वारे रेशन धान्य ...
निवेदनात म्हटले की, जुलै २०२१ महिन्याचे अद्याप ऑनलाइन स्टॉक प्राप्त झालेला नाही. त्यामुळे ई-पॉस मशीनद्वारे रेशन धान्य वितरण करण्यासाठी अडथळा येत आहे. वेळेवर धान्य मिळत नसल्याने लाभार्थी धान्यापाासून वंचित आहेत. त्यामुळे लाभार्थी तक्रारी करीत आहेत. याचा विनाकारण मानसिक त्रास होत आहे. जुलै महिन्यात ई-पॉस मशीनवर ऑनलाइन अन्न धान्य स्टॉक प्राप्त न झाल्यास धान्य घेण्यासाठी दुकानावर लाभार्थींची गर्दी होण्याची शक्यता आहे. परिणामी कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर आवश्यक नियमाचे पालन होत नसल्याने स्वस्त धान्य दुकानदार व लाभार्थींचे आरोग्य धोक्यात येण्याची शक्यता नाकारता येत नाही.
त्यामुळे ई-पॉस मशीनवर ऑनलाइन अन्न धान्य स्टॉक प्राप्त करून घ्यावे किंवा ऑफलाइन पद्धतीने अन्न धान्य वितरण करण्यासाठी परवानगी द्यावी, अशी मागणी या निवेदनात केली आहे. निवेदनावर संघटनेचे जिल्हाध्यक्ष भिकूलाल बाहेती, अशोक काळे, नवनाथ कानबाळे, फारकखान पठाण, आशिफ गौरी, राजू यादव, मिलिंद कवाणे आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.