लिंबाळा पाटीवर धुळीचे प्रमाण वाढले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 15, 2021 04:25 AM2021-01-15T04:25:06+5:302021-01-15T04:25:06+5:30
कळमनुरीत विजेचा लपंडाव सुरूच कळमनुरी : शहरातील गणेशनगर, रेणुकानगर, सहयोगनगर, शास्त्रीनगर, विकास नगर, नवीन बसस्थानक, जुने बसस्थानक आदी परिसरात ...
कळमनुरीत विजेचा लपंडाव सुरूच
कळमनुरी : शहरातील गणेशनगर, रेणुकानगर, सहयोगनगर, शास्त्रीनगर, विकास नगर, नवीन बसस्थानक, जुने बसस्थानक आदी परिसरात काही दिवसांपासून विजेचा लपंडाव नित्याचाच झाला आहे. यामुळे विजेवर चालणारी उपकरणे जळून जात आहेत. महावितरण कंपनीने याची दखल घेऊन वीजपुरवठा सुरळीत करावा, अशी मागणी ग्राहकांनी केली आहे.
गुजरी बाजार परिसरात शौचालयगृहाची मागणी
कळमनुरी : शहरातील गुजरी बाजार परिसरात शौचालयगृह नसल्यामुळे येथील व्यापाऱ्यांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. वेळोवेळी शौचालयगृह बांधण्याची मागणी केली. परंतु, कोणीही अद्याप याकडे लक्ष दिलेले नाही. नगरपरिषदेने मोकळ्या जागी शौचालय बांधून द्यावे, अशी मागणी होत आहे.
प्रवासी निवाऱ्याची दुरवस्था
हिंगोली : जिल्ह्यातील कळमनुरी, वसमत, औंढा नागनाथ आदी ठिकाणच्या प्रवासी निवाऱ्याची दुरवस्था झाली आहे. प्रवासी निवाऱ्याभोवती गवत व काटेरी झुडुपे वाढली आहेत. यामुळे प्रवाशांना बसण्यासाठी त्रास होत आहे. संबंधित विभागाने याची दखल घेऊन प्रवासी निवारे दुरुस्त करावेत, अशी मागणी प्रवाशांनी केली आहे.
नांदेड नाक्यावरील पथदिवे बंद
हिंगोली : शहरातील नांदेड नाक्यावरील पथदिवे मागील काही दिवसांपासून बंद आहेत. त्यामुळे रात्रीच्यावेळी प्रवाशांना त्रास होत आहे. नगरपरिषदेच्या संबंधित विभागाने याची दखल घेऊन नांदेड नाक्यावरील पथदिवे सुरु कराोत, अशी मागणी होत आहे.
नाल्यांवर औषध फवारणी करावी
हिंगोली : शहरातील शिवाजीनगर, शास्त्रीनगर आदी भागातील नाल्या अनेक दिवसांपासून साफ केल्या नाहीत. त्यामुळे पाणी रस्त्यावर येत आहे. यामुळे डासांचे प्रमाण वाढले आहे. नगरपरिषदेच्या स्वच्छता विभागाने या भागातील स्वच्छता मोहीम राबवावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.