चार दिवसांत कर्जमाफीची रक्कम खात्यावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 18, 2018 12:40 AM2018-02-18T00:40:31+5:302018-02-18T00:40:51+5:30
जिल्ह्यातील बहुतांश भागात एक ते दोन दिवस झालेल्या गारपीट व अवकाळी पावसाने शेतकºयांच्या तोंडी आलेला घास हिरावला आहे. त्यामुळे नुकसान झालेल्या शेतक-यांना भरपाई मिळणारच असून कर्जमाफीची रक्कमही खात्यावर चार दिवसांत पडणार असल्याचे पालकमंत्री दिलीप कांबळे यांनी सांगितले.
लोकमत न्यूज नेटवर्क
हिंगोली : जिल्ह्यातील बहुतांश भागात एक ते दोन दिवस झालेल्या गारपीट व अवकाळी पावसाने शेतकºयांच्या तोंडी आलेला घास हिरावला आहे. त्यामुळे नुकसान झालेल्या शेतक-यांना भरपाई मिळणारच असून कर्जमाफीची रक्कमही खात्यावर चार दिवसांत पडणार असल्याचे पालकमंत्री दिलीप कांबळे यांनी सांगितले.
महाराष्टÑ शासनाच्या कृषी विभाग, कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा यांच्या संयुक्त विद्यमाने घेतलेल्या जिल्हा कृषी महोत्सव व कयाधू बचत गटांचे प्रदर्शन व विक्री सेंद्रिय शेतीमाल व खरेदीदार विक्रेता संमेलनात पालकमंत्री बोलत होते. ते पुढे म्हणाले, जगाचा पोशिंदा असलेला शेतकरी हा निसर्गासमोर खरोखरच हतबल झाला आहे. त्याला यावर्षीच्याही हंगामात सोडलेले नाही. मात्र सध्याचे सरकार त्या शेतकºयाला वाºयावर न सोडता, त्याला कशा पद्धतीने अडचणीतून बाहेर काढता येईल यासाठी प्रयत्नशील आहे. तर शेतकºयांनी केवळ शेतीवरच लक्ष केंद्रित न करता शेतीला जोडव्यवसाय केल्यास निश्चितच उत्पन्न वाढण्यास मदत होईल. तसेच शेतकºयांनी मोठ्या कष्टाने पिकविलेले धान्य कोणत्याही दलालामार्फत न विक्री करता त्याला थेट बाजारपेठेत विक्री करता यावे म्हणूनच या कृषी प्रदर्शनीचे आयोजन केल्याचे सांगितले.
कांबळे म्हणाले, ज्या शेतकºयांचे गारपिटीने नुकसान झाले आहे. त्या शेतकºयांना १०० टक्के नुकसान भरपाई मिळणार म्हणजे मिळणारच ! असे कडक आदेशच मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांनी दिल्याचे कांबळे यांनी सांगितले. शिवाय, कर्जमाफीची रक्कम बहुतांश शेतकºयांच्या खात्यात जमा झाली आहे. ज्यांची झाली नसेल त्यांच्याही खात्यात येत्या दोन ते तीन दिवसांत जमा होणार आहे. त्यामुळे शेतकºयांनी मोठ्या धिराने शेतीची कामे करत-करत पाण्याचेही नियोजन करावे. जास्त पाणी दिल्यानेही जमिनीचा पोत बदलण्याची चिन्हे असतात. अनेक जिल्ह्यांत तशा पद्धतीचीही उदहारणेही असल्याचे ते म्हणाले. तर बचत गटातील महिलांना अल्पदरात कर्ज उपलब्ध करुन देणारच आहोत. तसेच शून्य टक्के व्याजदारानेच कर्ज उपलब्ध करुन देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे कांबळे म्हणाले. तसेच मागासवर्गीय बचत गटासाठी १०० टक्के अनुदानावर ट्रॅक्टरही उपलब्ध करुन दिले जाणार आहे. त्यामुळे निश्चतच तंत्राज्ञानाचा वापर करुन शेतीतील उत्पन्न काढण्यास मदत होईल.
यावेळी आ. तान्हाजी मुटकुळे, आ.डॉ. संतोष टारफे, प्रभारी जिल्हाधिकारी जगदिश मिनियार, जि. प. सीईओ डॉ. एच. पी. तुम्मोड यांनीही शेतकºयांना मार्गदर्शन केले. सूत्रंसचालन विजय ठाकरे, प्रास्ताविक एम. डी. जाधव तर आभार एम. डी. तीर्थकर यांनी मानले. कार्यक्रमास मान्यवरांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.
माहिती : रोज मिळणार नव- नवीन ज्ञान
कृषी प्रदर्शनीमध्ये जवळपास ४० ते ५० बचत गट दाखल झा आहेत. विशेष म्हणजे पाच दिवस चालणाºया या प्रदर्शनीमध्ये विविध खाद्य पदार्थासह वस्तू ही विक्रीसाठी ठेवण्यात येणार आहेत. त्याच बरोबर शेतीला जोड व्यवसाय करता यावा म्हणून विविध प्रकारचे व्यवसाय करता यावे म्हणून
तज्ज्ञ शास्त्रज्ञांचे मार्गदर्शन ठेवण्यात येणार आहे. शिवाय, तांत्रीक पद्धतीने शेती कशी करता येईल यासाठी लागणाºया यंत्र सामुग्रीचेही नव- नवीन पाच दिवस मार्गदर्शन केले जाणार असल्याचे आ. तान्हाजी मुटकुळे यांनी सांगितले.
कृषि प्रदर्शनीनिमित्त शासकीय विश्रामगृह येथून काढलेल्या पालखीला स्वत: पालकमंत्री दिलीप कांबळे यांनी खांदा देऊन दिंडी सोबत प्रदर्शनीपर्यंत चालत आले. तर दिंंडीमध्ये उत्कृष्ट लेझीम खेळणाºया व स्वागत गित गाणाºया अंध विद्यार्थ्यांचेती त्यांनी तोंड भरुन कौतूक
जिल्ह्यात ७८ गावांचे नुकसान
४पालमंत्री कांबळे यांनी हिंगोली तालुक्यातील सिरसम, लिंबाळा, डिगी, आडगाव या भागातील शेतीची नुकसानीची पाहणी करुन १५ शेतकºयांशी सवांद साधला. जिल्ह्यात एकूण ७८ गावांचे नुकसान झाले आहे. जिरायती ८ हजार ८, तर बागायती ४ हजार ४४७ हेक्टरचे नुकसान झाले आहे. तसेच नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश दिले आहेत. पंचनामे होताच येत्या आठ ते दहा दिवसांत शेतकºयांना भरपाई मिळेल, असे ते म्हणाले.
पालिकेच्या कामाची चौकशी करणार
४सन २००६- १५ या कालावधीमध्ये नगरपालिकेच्या वतीने करण्यात आलेल्या सर्वच कामांची चौकशी करण्यात येणार आहे. या कामांमध्ये काही अनियमितता आहे काय? याची काटेकोरपणे तपासणी होईल, असेही पालकमंत्री कांबळे म्हणाले. तर एनटीसी भागाच्या चौकशीचेही त्यांनी सुतोवाच केले. जिल्ह्याला मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून ८३ कोटी ५८ लाख रुपये मंजूर झाले आहेत.