रस्त्यातील भेगाने घात झाला; दुचाकी घसरून संक्रांतीसाठी मामाकडे निघालेल्या दोघांचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Published: January 15, 2023 03:18 PM2023-01-15T15:18:49+5:302023-01-15T15:23:46+5:30

सवना (ता. सेनगाव) पासून तीन किलोमीटर अंतरावर रस्त्याच्या मध्यभागी रस्ता तडकला (मोठी भेग पडली) आहे. त्यामुळे येथे नेहमीच अपघात होत आहेत.

An ambush occurred through a crack in the road; Two who went to Mama for Sankranti died on the spot due to bike slip | रस्त्यातील भेगाने घात झाला; दुचाकी घसरून संक्रांतीसाठी मामाकडे निघालेल्या दोघांचा मृत्यू

रस्त्यातील भेगाने घात झाला; दुचाकी घसरून संक्रांतीसाठी मामाकडे निघालेल्या दोघांचा मृत्यू

googlenewsNext

- प्रवीण नायक
सवना  ( जि. हिंगोली) : सेनगाव तालुक्यातील सवना येथून तीन किमी अंतरावर शिवजवळील सिमेंट रोडवर पडलेला भेगांमुळे आज पहाटे ३ वाजता दुचाकी घसरून अपघात झाला. अपघातात दुचाकीवरील  दोघांचा मृत्यू झाला. तर तिसऱ्या युवकास हिंगोलीच्या जिल्हा रुग्णालयात दाखल केले आहे.

गोरेगाव येथील मामाच्या गावाला जाऊन मकर संक्रांतीनिमित्त तिळगुळ द्यायचे, असे त्यांनी ठरवले होते. परंतु काळाने दोघांवर घाला घातला. कवणा पासून तीन किलोमीटर अंतरावर  मध्यभागी रस्ता उखडला आहे. वारंवार ग्रामस्थांनी तक्रार करूनही अद्याप हा रस्ता दुरुस्त केला नाही. त्यामुळे या ठिकाणी नेहमीच अपघात घडवून येत आहेत. दरम्यान, सवना येथील विशाल भारतराव नायक (वय 34)  व तसेच सुनील लक्ष्मणराव चौधरी ( 25/ वर्ष रा.  बोरी या दोघांचा दुचाकी घसरल्याने जागीच मृत्यू झाला आहे. तसेच जखमी असलेला संदीप बालाजी शिंदे वय 25 वर्ष रा बोरी याला प्रथम उपचारासाठी गोरेगाव येथील उपकेंद्रामध्ये दाखल करण्यात आले होते.  प्रकृती गंभीर असल्याने त्याला हिंगोली येथे शासकीय रुग्णालयात रेफर करण्यात आले आहे.

सवना येथील मयत विशाल भारतराव नायक यांच्या आत्याचा मुलगा मयत सुनील लक्ष्मणराव चौधरी व तसेच जखमी असलेला संदीप बालाजी शिंदे हे तिघेजण गोरेगाव कडून सवना येथे येत असताना शिवर आज सकाळच्या वेळी तीन वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला आहे. विशाल भारतराव नायक हा आई-वडिलाला एकुलता एकच मुलगा होता. याचे मागच्या वर्षी लग्न झाले होते व तसेच बोरी येथील मयत सुनील लक्ष्मणराव चौधरी हा काही दिवसापूर्वीच चंद्रपूरला (एस आर पी एफ) मध्ये सिलेक्शन झाले होते अशी ही दुर्देवी घटना आज सवना परिसरात शिव जवळील टर्नवर घडली आहे या घटनेची माहिती मिळताच 108 ॲम्बुलन्स व 112 पोलीस प्रशासन घटनास्थळी तात्काळ दाखल झाले होते. यावेळी गोरेगाव पोलीस स्टेशन चे पोलीस निरीक्षक हुंडेकर साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली कनेरगाव पोलीस चौकीचे पोलीस उपनिरीक्षक बाबुराव जाधव व पोलीस कर्मचारी डी एस उजगिरे, मैयनकर, एस आय  भोनर,मारकड सवना येथील पोलीस पाटील विजय बेद्रे यांनी घटनास्थळी येऊन मयतांना गोरेगाव येथे आरोग्य उपकेंद्रामध्ये दाखल करून पीएम करण्यात आले. या घटनेची माहिती कळताच सवना येथील ग्रामस्थांनी धाव घेतली होती.

सवना ते गोरेगाव दरम्यानचा शिवजवळील सिमेंट रोड हा आणखी किती जणांचा बळी घेणार असा सवाल वाहनधारकांकडून होत आहे. बऱ्याच वेळा बातम्या प्रकाशित करून ही याकडे संबंधित कंत्राटदार जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत असल्याचे पहावयास मिळत आहे.

Web Title: An ambush occurred through a crack in the road; Two who went to Mama for Sankranti died on the spot due to bike slip

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.