...तर अधिकारी-कर्मचाऱ्यांवर होणार कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 8, 2019 12:10 AM2019-01-08T00:10:39+5:302019-01-08T00:10:57+5:30

जे शासकीय अधिकारी-कर्मचारी दुचाकी चालविताना हेल्मेटचा वापर करणार नाहीत, त्यांच्यावर मोटार वाहन कायद्यांतर्गत दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे. दुचाकी चालकांचे होणारे अपघाताचे प्रमाण कमी करण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.

 ... and action will be taken against officials and employees | ...तर अधिकारी-कर्मचाऱ्यांवर होणार कारवाई

...तर अधिकारी-कर्मचाऱ्यांवर होणार कारवाई

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
हिंगोली : जे शासकीय अधिकारी-कर्मचारी दुचाकी चालविताना हेल्मेटचा वापर करणार नाहीत, त्यांच्यावर मोटार वाहन कायद्यांतर्गत दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे. दुचाकी चालकांचे होणारे अपघाताचे प्रमाण कमी करण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.
रस्त्यावरील अपघाताचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. विशेष करून दुचाकी चालकांचे होणारे अपघाताचे प्रमाण मोठ्या प्रमाणावर आहे. अपघाताचे प्रमाण कमी करण्याच्या दृष्टिकोनातून त्यांचा वेळोवेळी आढावा घेण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार देश पातळीवर रस्ता सुरक्षा समिती, राज्य पातळीवर राज्य सुरक्षा समिती व जिल्हास्तरावर जिल्हा सुरक्षा समितीची स्थापना करण्यात आलेली आहे.
हिंगोली जिल्हा रस्ता सुरक्षा समितीच्या बैठकीमध्ये आपघातांचा आढावा घेतला असता दुचाकी वाहनाचे अपघाताचे प्रमाण जास्त असल्याचे दिसून येते. त्यावरुन रस्त्यावरील अपघात कमी करण्याच्या दृष्टिकोनातून दुचाकी चालवताना हेल्मेटचा वापर करणे गरजेच आहे. दुचाकीच्या अपघातांमध्ये डोक्यावर पडून होणाºया मृत्यूचे प्रमाण कमी करण्यासाठी हेल्मेट वापरणे बंधनकारक आहे. असे असतानाही हेल्मेटचा वापर होत नसल्याचे जिल्ह्यात चित्र दिसून येत आहे. सर्वसामान्य वाहनचालकांसाठी हेल्मेटची सक्ती करण्या अगोदर मोटार वाहन कायदा १९८८ च्या कलम १२९ व महाराष्ट्र मोटार वाहन नियम १९८९ नियम २५० च्या तरतुदीनुसार शासकीय, निमशासकीय कार्यालयातील जे अधिकारी व कर्मचारी दुचाकीचा वापर करतात त्यांना १५ जानेवारी २०१९ पासून हेल्मेट वापरणे बंधनकारक असल्यसाचे समितीमध्ये ठरविण्यात आले आहे. त्या अनुषंगाने हिंगोली जिल्ह्यात मोहीम हाती घेण्यात आली असून कारवाई केली जाणार आहे. जिल्ह्यातील सर्व शासकीय निमशासकीय कार्यालय प्रमुखांनी त्यांच्या अधिपत्याखाली असलेल्या सर्व अधिकारी व कर्मचाºयांना हेल्मेट वापराबाबत सूचना द्याव्यात. व हेल्मेट न वापरणाºयाविरूद्ध कडक कारवाई केली जाईल अशी माहिती जिल्हा सुरक्षा समितीने सांगितले.
हेल्मेटचा वापर न करता दुचाकी चालविणे धोकादायक आहे. दुचाकी चालविताना सर्वांनीच हेल्मेट वापरणे गरजेचे आहे. हेल्मेट न वापरता दुचाकी चालविताना आढळून आल्यास त्यांच्याविरूद्ध थेट कारवाई केली जाणार आहे. विशेष म्हणजे शासकीय किंवा निमशासकीय विभागातील अधिकारी व कर्मचारी दररोज दुचाकीवरून ये-जा करतात. त्यांनीही हेल्मेटचा वापर करणे आवश्यक आहे. हेल्मेट न वापरता दुचाकीस्वार आढळून आल्यास त्याच्याविरूद्ध कारवाई केली जाईल - अशोक पवार, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी.

Web Title:  ... and action will be taken against officials and employees

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.