..तर अतिक्रमित जागेवरही घरकुल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 24, 2018 12:30 AM2018-08-24T00:30:13+5:302018-08-24T00:31:04+5:30

शासकीय जागेवर अतिक्रमण करून राहणाऱ्यांची दिलेल्या निकषानुसार नमुना क्र.८ ला नोंद असल्यास अशांना आता नियमाकुल केले जाणार आहे. त्यामुळे राज्यात रखडलेल्या हजारो घरकुलांचा मार्ग मोकळा होणार असून हिंगोली जिल्ह्यातही अशा शेकडो घरकुलांचा प्रश्न प्रलंबित आहे.

 ... and crib on the encroached space | ..तर अतिक्रमित जागेवरही घरकुल

..तर अतिक्रमित जागेवरही घरकुल

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
हिंगोली : शासकीय जागेवर अतिक्रमण करून राहणाऱ्यांची दिलेल्या निकषानुसार नमुना क्र.८ ला नोंद असल्यास अशांना आता नियमाकुल केले जाणार आहे. त्यामुळे राज्यात रखडलेल्या हजारो घरकुलांचा मार्ग मोकळा होणार असून हिंगोली जिल्ह्यातही अशा शेकडो घरकुलांचा प्रश्न प्रलंबित आहे.
ग्रामीण भागात शासकीय जमिनीवर अतिक्रमण करून राहणाºया अनेक बेघरांना घरकुल योजनेत लाभ मिळाला. मात्र आता जागा नसल्याने पेच निर्माण झाला आहे. गाव नमुना क्र.८ ला नोंद असूनही या जागेची मालकी शासकीय असल्याने त्यांना घरकुल बांधकामास परवानगी मिळत नव्हती. खास घरकुल योजनेसाठी काढलेल्या या नव्या मार्गदर्शक सूचनांनुसार मालमत्ताधारकाच्या नावापुढे सरकारी अतिक्रमण अशी नोंद असल्यास ग्रामसेवकाने तसे प्रमाणित करायचे आहे. विस्तार अधिकाºयांनी त्याची काटेकोर तपासणी करून पंचायत समितीत सादर करायचे आहे. हे संगणकप्रणालीवर अपलोड करायचे आहे. त्यात केंद्रचालकाने डाटा एन्ट्री करताना कुणालाही वगळले नाही, याची ग्रामसेवकाने खात्री करून आॅनलाईन प्रमाणित करायचे आहे. ही यादी ग्रा.पं.त प्रसिद्ध करायची आहे. ही यादी ग्रामसभेतही प्रसिद्ध करायची आहे. यावर आक्षेपासाठी १५ दिवसांची मुदत देऊन ग्रामसभेनेही त्यास मान्यता दिल्यास आॅनलाईन प्रमाणित करायचे आहे. तर आक्षेप आल्यास त्यावर करावयाची प्रक्रियाही या शासन निर्णयात दिली आहे.
यापूर्वी शासनाने दीनदयाल उपाध्याय योजनेत घरकुल लाभार्थ्यांना जागा खरेदीसाठी ठराविक रक्कम देण्याची योजना काढली होती. मात्र त्यात तुटपुंजी रक्कम मिळत होती. तर जागेचे दर गगनाला भिडलेले आहेत. त्यामुळे ती अपयशी ठरली. शासकीय जागेवर अतिक्रमणाची जागा चालत नव्हती. तर नवीन जागा मिळत नव्हती.
अनेक घरकुले अपूर्ण : शेकडो रद्दही !
२0१२-१३ पासून जागेसह इतर समस्येमुळे काही घरे रखडली तर काही रद्दच केली. २0१२-१३ ची अपूर्ण ४0 तर ९ रद्द, १३-१४ ला १५ अपूर्ण तर ८ रद्द २0१४ -१५ मध्ये ५0३ अपूर्ण तर १0६ रद्द करण्यात आली आहेत. तर २0१५-१६ मध्ये सर्वाधिक ७0६ अपूर्ण तर ४१ रद्द करण्यात आली होती.
२0१६-१७ पासून चार हप्त्यांत घरकुलाचे आॅनलाईन काम सुरू झाले. यात प्रधानमंत्री आवासची २0१६-१७ मध्ये ३४३८ पैकी २६४१, रमाईची ९९२ पैकी ६७८, शब्री योजनेत २२६ पैकी १६४, पारधी योजनेत १३ पैकी ८ कामेच पूर्ण झाली आहेत.
गरीब असूनही यादीत न आलेल्यांना प्रपत्र ड मध्ये नोंदवून घेण्यास आता ३0 सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. त्यासाठी एक मोबाईल अ‍ॅपही काढण्यात आले आहे.

Web Title:  ... and crib on the encroached space

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.