शिवसेनेचे चिन्ह गोठवल्याचा संताप: मुख्यमंत्र्यांचा पुतळा जाळला, 10 जण पोलीसांच्या ताब्यात
By ऑनलाइन लोकमत | Published: October 9, 2022 07:14 PM2022-10-09T19:14:12+5:302022-10-09T19:14:38+5:30
वसमत: निवडणूक आयोगाने शिवसेनेचे चिन्ह गोठवण्याचा निर्णय घेतला. या निर्णयानंतर राज्यभरात संताप व्यक्त होत आहे. दरम्यान, वसमतच्या पांग्रा शिंदे येथे ...
वसमत: निवडणूक आयोगाने शिवसेनेचे चिन्ह गोठवण्याचा निर्णय घेतला. या निर्णयानंतर राज्यभरात संताप व्यक्त होत आहे. दरम्यान, वसमतच्या पांग्रा शिंदे येथे या निर्णयावर संताप व्यक्त करण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा पुतळा जाळण्यात आला. यावेळी पोलीस प्रशासनाने दखल घेत १० जणांना ताब्यात घेतले.
वसमत तालुक्यातील पांग्रा शिंदे येथे ९ अॉक्टोंबर रोजी सकाळी ८ वाजता शिवसैनिकांनी पक्षाचे नाव व चिन्ह गोठवल्याबद्दल संताप व्यक्त करत मुख्यमंत्री यांच्या प्रतिकात्मक पुतळयाचे दहन केले. यावेळी मुख्यमंत्र्यांविरोधात घोषणाबाजीही करण्यात आली. याघटनेची माहिती मिळताच कुरुंदा पोलीस ठाण्याचे सपोनि गजानन मोरे, गजानन भोपे, बालाजी जोगदंड, तुकाराम आम्ले, संतोष पटवे यांच्यासह पोलीस पथकाने धाव घेत परस्थिती नियंत्रणात आणली. यावेळी त्यांनी गटातील १० जणांना ताब्यात घेतले. याप्रकरणी उशीरापर्यंत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया चालू होती.