मोबाईलमध्ये बहिणीचे फोटो पाहून राग अनावर, मित्रानेच काढला जिवलग मित्राचा काटा

By ऑनलाइन लोकमत | Published: April 24, 2022 03:11 PM2022-04-24T15:11:34+5:302022-04-24T15:11:50+5:30

औंढा नागनाथ तालुक्यातील ढेगज येथे ही घटना घडली असून, या प्रकरणातील अल्पवयीन आरोपीला अटक करण्यात आली आहे.

Angry after seeing sister's photo in friends mobile, fried killed his close friend in Aundha nagnath | मोबाईलमध्ये बहिणीचे फोटो पाहून राग अनावर, मित्रानेच काढला जिवलग मित्राचा काटा

मोबाईलमध्ये बहिणीचे फोटो पाहून राग अनावर, मित्रानेच काढला जिवलग मित्राचा काटा

Next

सिद्धेश्वर/ नंदगाव ( जि.हिंगोली) : औंढा नागनाथ तालुक्यातील ढेगज येथील १६ वर्षीय मुलाच्या मोबाईलमध्ये बहिणीचे फोटो पाहून त्याचा कायमचा काटा काढण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. दोन दिवसांपूर्वी गावातील एका बाथरूममध्ये मुलाचा मृतदेह आढळून आला होता. याप्रकरणी औंढा नागनाथ पोलीस ठाण्यात खूनाचा गुन्हा दाखल झाला आहे.

औंढा नागनाथ तालुक्यातील ढेगज येथील शुभम अंकूश आडे हा २१ एप्रिल रोजी बेपत्ता झाला होता. नातेवाईकांनी त्याचा शोध घेतला असता २२ एप्रिल रोजी दुपारी ३ वाजेच्या सुमारास गावातील पंडित आडे यांच्या घरासमोरील बाथरूममध्ये शुभमचा संशयास्पद मृतदेह आढळून आला होता. या घटनेची माहिती मिळताच अप्पर पोलीस अधीक्षक यशवंत काळे, उप विभागीय पोलीस अधिकारी विवेकानंद वाखारे, पोलीस निरीक्षक विश्वनाथ झुंजारे, सहायक पोलीस निरीक्षक लांडगे, फौजदार सुवर्णा वाळके यांनी घटनास्थळी भेट देवून पाहणी केली. पोलिसांनी काही संशयीतांची चौकशीही केली.

अखेर याप्रकरणी २३ एप्रिल रोजी अंकूश हरिभाऊ आडे यांच्या फिर्यादीवरून अल्पवयीन आरोपी (रा. ढेगज) याचेसह इतरांवर गुन्हा नोंद झाला. शुभम आडे याच्या मोबाईलमध्ये बहिणीचे फोटो पाहूनच त्याच्याशी अल्पवयीन आरोपीने वाद घातला. तसेच जीवे मारण्याची धमकी दिली होती. फोटो काढल्याचा राग मनात धरून आरोपीने मारहाण करून गळा दाबून शुभम आडे याचा खून केल्याचे पोलिसांना दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे. याप्रकरणी पोलीस इतर आरोपींचा शोध घेत आहेत. सहायक पोलीस निरीक्षक लांडगे तपास करीत आहेत.

Web Title: Angry after seeing sister's photo in friends mobile, fried killed his close friend in Aundha nagnath

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.