जिल्ह्यात राजमाता जिजाऊ यांची जयंती साजरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 14, 2021 04:25 AM2021-01-14T04:25:01+5:302021-01-14T04:25:01+5:30

हिंगोलीतील शिवाजीनगर येथील दिशा ग्रामीण विकास प्रतिष्ठान या सेवाभावी संस्थेत राजमाता जिजाऊ यांची जयंती साजरी करण्यात आली. अध्यक्षस्थानी ...

Anniversary of Rajmata Jijau celebrated in the district | जिल्ह्यात राजमाता जिजाऊ यांची जयंती साजरी

जिल्ह्यात राजमाता जिजाऊ यांची जयंती साजरी

Next

हिंगोलीतील शिवाजीनगर येथील दिशा ग्रामीण विकास प्रतिष्ठान या सेवाभावी संस्थेत राजमाता जिजाऊ यांची जयंती साजरी करण्यात आली. अध्यक्षस्थानी ॲड. गणेश बिनगे तर प्रमुख पाहुणे म्हणून संस्थेचे अध्यक्ष ॲड. उल्हास पाटील, ॲड. शफीक पठाण, ॲड. मारोती कदम, ॲड. नवनाथ पारोकर, नारायण भिसे, गजानन दंतवार, ॲड. विलास नवघरे, ॲड. रवी थिटे, ओमप्रकाश भिसे आदी उपस्थित होते. प्रारंभी राजमाता जिजाऊ यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. सूत्रसंचालन रामप्रसाद इंगळे यांनी केले तर अविनाश खिल्लारे यांनी आभार मानले.

शंकरराव सातव शिक्षणशास्त्र महाविद्यालय

कळमनुरी येथील कै. डॉ. शंकरराव सातव शिक्षणशास्त्र महाविद्यालयात राजमाता जिजाऊ यांची जयंती साजरी करण्यात आली. यावेळी डॉ. व्ही. पी. मोरे, डॉ. एफ. डी. बाशेट्टी, कर्मचारी उपस्थित होते.

नूतन साहित्य मंदिर वाचनालय

हिंगोली शहरातील कै. रंभाबाई रामचंद्र बियाणी नूतन साहित्य मंदिर वाचनालयात राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांची जयंती साजरी करण्यात आली. प्रास्ताविक संस्थेचे अध्यक्ष प्रा. जी. पी. मुपकलवा यांनी केले. सूत्रसंचालन संतोष ससे यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी ग्रंथालयाचे कर्मचारी रामेश्वर गांजवे, संतोष सामाले, लक्ष्मण सावळे, लक्ष्मण लाड यांनी सहकार्य केले.

Web Title: Anniversary of Rajmata Jijau celebrated in the district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.