आदर्श महाविद्यालयात वार्षिक प्रशिक्षण शिबिर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 18, 2021 04:55 AM2021-02-18T04:55:37+5:302021-02-18T04:55:37+5:30

या शिबिरातील शिबिरार्थी छात्रसैनिकांना कमांडिग ऑफिसर ५२ महाराष्ट्र एनसीसी बटालियन, नांदेड कर्नल शेषासाई यांनी मार्गदर्शन केले. जीवनातील सैन्य जीवनाचा ...

Annual training camp at Adarsh College | आदर्श महाविद्यालयात वार्षिक प्रशिक्षण शिबिर

आदर्श महाविद्यालयात वार्षिक प्रशिक्षण शिबिर

googlenewsNext

या शिबिरातील शिबिरार्थी छात्रसैनिकांना कमांडिग ऑफिसर ५२ महाराष्ट्र एनसीसी बटालियन, नांदेड कर्नल शेषासाई यांनी मार्गदर्शन केले. जीवनातील सैन्य जीवनाचा अनुभव सादर करत एनसीसीमध्ये सहभागी छात्रसैनिकांचा सैन्यात भरती होण्याचा संकल्प व पूर्वतयारी पूर्ण करण्यासाठी छात्रसेना माध्यम असून यांचा लाभ घ्यावा, असे आवाहन केले.

एकता आणि अनुशासन अबाधित राखून जीवनक्रम केल्यास जीवनाला गतिशीलता येते, अशी भावना प्राचार्य डॉ. बी. डी. वाघमारे यांनी व्यक्त केली. या कॅम्पमध्ये शस्त्र कवायत, नकाशा माध्यम, अम्बुरा, पेट्रोलिंग या विविध स्पर्धेतील विजयी छात्रसैनिकांना कमांडिग ऑफिसर कर्नल शेषासाई व प्राचार्य डॉ. वाघमारे यांच्या हस्ते गौरविण्यात आले.

यावेळी सोमेश्वर कापसे, विवेक भालेराव, नागसेन बलखंडे, अमर पवार, ऋषिकेश वाघमारे, चेतन कांबळे, संघर्ष नखाडे, आदित्य तोडकरी यांना स्वर्ण व रौप्य पदक देऊन गौरविण्यात आले. तसेच उत्कृष्ट भोजन दिल्याबद्दल मुन्ना महाराज यांचा सत्कार करण्यात आला. कॅम्प यशस्वी करण्यासाठी मेजन पंढरीनाथ घुगे, सुभेदार मेजर विक्रम सिंग, सुभेदार महादेव भोसले, हवालदार संजय कुमार, रतन देवनाथ, विठ्ठल गवळी, अन्सारी, पंढरीनाथ मोरे, सुधीर बांगर यांनी परिश्रम घेतले.

फोटो नं. ९

Web Title: Annual training camp at Adarsh College

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.