नर्सी तीर्थक्षेत्राला आणखी १५ कोटी मंजूर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 1, 2019 11:39 PM2019-03-01T23:39:09+5:302019-03-01T23:39:24+5:30
तालुक्यातील नर्सी नामदेव येथील तीर्थक्षेत्र विकासासाठी यापूर्वी जवळपास सहा कोटी मंजूर झाले होते. उर्वरित १५ कोटी आता मंजूर झाले आहेत. यामधून मंदिर परिसरात विविध विकासकामे होणार आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
हिंगोली : तालुक्यातील नर्सी नामदेव येथील तीर्थक्षेत्र विकासासाठी यापूर्वी जवळपास सहा कोटी मंजूर झाले होते. उर्वरित १५ कोटी आता मंजूर झाले आहेत. यामधून मंदिर परिसरात विविध विकासकामे होणार आहेत.
यासाठी आ.तान्हाजी मुटकुळे यांनी मुख्यमंत्र्यांकडे बैठक लावली होती. तेव्हा उच्चाधिकार समितीने केवळ सहा कोटी रुपयांची कामे पहिल्या टप्प्यात मंजूर केली होती. आता १५ कोटींचा आराखडा मंजूर झाला आहे. यामध्ये सार्वजनिक शौचालयास -२९.६८ लाख, सांडपाणी व्यवस्थापनासाठी ३७.७0 लाख, घनकचरा व्यवस्थापनासाठी ६५ लाख, भक्तनिवासासाठी १.४१ लाख, सभामंडपासाठी ५ कोटी, सुरक्षा चौकीसाठी २९.८७ लाख, विद्युतीकरण बाहेरील-८१.८३ लाख, विद्युतीकरण आतील- ६८ लाख, वाहनतळ काँक्रिटीकरण-२८.३३ लाख, सौर उर्जा प्रकल्प १९.२६ लाख, अग्निशामक यंत्रणा-१३.६१ लाख, मृद तपासणी-५.९१ लाख, जमीन विकास-१८ लाख, घाट बांधकाम १ कोटी, डस्ट बिन-२ लाख, दिशादर्शक फलक-४ लाख, आकस्मिक खर्च-५१ लाख व प्रकल्पावर कर व इतर बाबींचा सव्वा दोन कोटींचा खर्च येत आहे.
नर्सी नामदेव येथे लोकवर्गणीतून भव्य मंदिराची उभारणी झाल्यानंतर आता ही नवीन कामेही मंजूर झाली आहेत. त्यामुळे नर्सीला तीर्थक्षेत्रासह पर्यटनदृषट्याही महत्त्व येणार आहे. या ठिकाणी वारकरी संप्रदायाच्या भाविकांची कायम मोठी गर्दी असते. त्यांना विविध सुविधांचाही यापुढे लाभ मिळणार आहे.