कोरोना रूग्णांच्या वाढत्या संख्येने वाढविली चिंता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 20, 2021 05:26 AM2021-02-20T05:26:32+5:302021-02-20T05:26:32+5:30
हिंगोली: कोरोना रूग्णांच्या वाढत्या संख्येंने चिंता वाढविली असून जिल्ह्यात कोरोनाचे नव्याने १३ रूग्ण आढळले आहेत. तर ६ रूग्ण बरे ...
हिंगोली: कोरोना रूग्णांच्या वाढत्या संख्येंने चिंता वाढविली असून जिल्ह्यात कोरोनाचे नव्याने १३ रूग्ण आढळले आहेत. तर ६ रूग्ण बरे झाल्याने त्यांना रूग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे.
जिल्ह्यात वसमत, कळमनुरी, सेनगाव परिसरात ५१ जणांची रॅपिड अँटिजेन टेस्ट घेतली असता यामध्ये कळमनुरी परिसरात कोरोनाचे ३ रूग्ण आढळले. तसेच हिंगोली, औंढा परिसरातील काही जणांची आरटीपीसीआर टेस्ट घेतली असता यात हिंगोली परिसरात कोरोनाचे ९ रूग्ण तर औंढा परिसरात १ रूग्ण आढळून आला. त्यामुळे दिवसभरातील कोरोना रूग्णांची संख्या १३ झाली आहे. दरम्यान, गुरूवारी जिल्हा सामान्य रूग्णालयातील ४ तर वसमत येथील कोरोना केअर सेंटरमधील २ असे ६ रूग्णांची प्रकृती बरी झाल्याने त्यांना रूग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे. आतापर्यंत एकूण कोरोना रूग्णांची संख्या ३ हजार ८८४ झाली आहे. यापैकी ३ हजार ७२५ रूग्ण बरे झाले आहेत. आजघडीला ६५ रूग्णांवर उपचार सुरू असून आतापर्यंत ५८ रूग्णांचा मृत्यू झाला आहे. जिल्हा सामान्य रूग्णालयातील आयसोलेशन वाॅर्डात उपचार घेत असलेल्या ५ रूग्णांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना ऑक्सिजनवर ठेवण्यात आले असल्याची माहिती जिल्हा रूग्णालय प्रशासनाने दिली.