सामाजिक न्याय विभागाच्या शिष्यवृत्ती योजनांकरिता ऑनलाइन अर्ज करण्याचे आवाहन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 13, 2021 05:17 AM2021-01-13T05:17:25+5:302021-01-13T05:17:25+5:30
त्या अनुषंगाने जिल्ह्यातील सर्व शासनमान्य मान्यताप्राप्त अनुदानित, विनाअनुदानित महाविद्यालयाचे प्राचार्य व महाविद्यालयामध्ये प्रवेश घेतलेल्या अनु. जाती, विमुक्त जाती भटक्या, ...
त्या अनुषंगाने जिल्ह्यातील सर्व शासनमान्य मान्यताप्राप्त अनुदानित, विनाअनुदानित महाविद्यालयाचे प्राचार्य व महाविद्यालयामध्ये प्रवेश घेतलेल्या अनु. जाती, विमुक्त जाती भटक्या, इतर प्रर्वगातील विद्यार्थ्यांकरिता भारत सरकार शिष्यवृत्ती व शिक्षण शुल्क, परीक्षा शुल्क, राजर्षी शाहू महाराज गुणवत्ता शिष्यवृत्ती, व्यावसायिक पाठ्यक्रमांशी संलग्न असलेल्या विद्यार्थ्यांना निर्वाह भत्ता मंजूर करणे या योजनेंतर्गत २०१९-२० या शैक्षणिक वर्षासाठी री-अपील करण्यासाठी व सन २०२०-२१ या करिता नवीन अर्ज करण्यासाठी महाडीबीटी हे पोर्टल ३ डिसेंबरपासून सुरू आहे.
योजनेकरिता अर्ज करण्याची अंतिम ३१ जानेवारी असून जिल्ह्यातील अनुसूचित जाती, विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागासवर्गीय व विशेष मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांनी विहित मुदतीमध्ये शिष्यवृत्तीचे अर्ज संकेतस्थळावरती भरावेत. तसेच महाविद्यालयांनी सदरचे अर्ज छाननी करून शिष्यवृत्ती पात्र विद्यार्थ्यांचेच अर्ज समाज कल्याण कार्यालयाकडे सादर करावेत.
तसेच ज्या मागासवर्गीय प्रवर्गातील विद्यार्थ्यांनी नॉन आधार अर्ज भरले आहेत, अशा विद्यार्थ्यांनी त्यांच्या प्राेफाईलमधील आधार क्रमांक अद्ययावत करावा. तसेच आधार संलग्नीकृत बँक खाते आहे की नाही, याची खातरजमा लिंकद्वारे करून घ्यावी, असे आवाहन समाज कल्याण सहायक आयुक्त शिवानंद मिनगिरे केले आहे.