शिष्यवृत्तीचा लाभ घेण्यासाठी अर्ज करण्याचे आवाहन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 27, 2021 04:32 AM2021-08-27T04:32:39+5:302021-08-27T04:32:39+5:30
दहावी, बारावी, पदवी, पदव्युत्तर वैद्यकीय व अभियांत्रिकी इत्यादी अभ्यासक्रमामध्ये विद्यार्थ्यांना सरासरी ६० टक्के किंवा त्यापेक्षा जास्त गुण प्राप्त झाले ...
दहावी, बारावी, पदवी, पदव्युत्तर वैद्यकीय व अभियांत्रिकी इत्यादी अभ्यासक्रमामध्ये विद्यार्थ्यांना सरासरी ६० टक्के किंवा त्यापेक्षा जास्त गुण प्राप्त झाले असतील, अशा उत्तीर्ण झालेल्या मातंग समाज व तत्सम १२ पोट जातीतील विद्यार्थी, विद्यार्थिनींना २०२१-२२ शैक्षणिक वर्षासाठी महामंडळाकडून क्रमांकानुसार जिल्ह्यातील प्रथम ३ ते ५ विद्यार्थ्यास शिष्यवृत्तीचे वितरण करण्यात येणार आहे. यासाठी १२ ऑगस्टपर्यंत अर्ज मागविण्यात आले होते. योजनेचा लाभ घेण्यासाठी मुदत १५ सप्टेंबरपर्यंत वाढविण्यात आली आहे.
याचा लाभ घेण्यासाठी शाळा सोडल्याचा दाखला, गुणपत्रक, रेशनकार्ड, जातीचा दाखला, उत्पन्नाचा दाखला, आधारकार्ड, पुढच्या वर्गात प्रवेश घेतल्याची पावती, बोनाफाईड सर्टिफिकेट आदी कागदपत्र साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे विकास महामंडळ कार्यालयात आणून द्यावेत, असे महामंडळाच्या जिल्हा व्यवस्थापकांनी केले आहे.