‘बर्ड फ्लू’बाबत सतर्कता बाळगण्याचे आवाहन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 25, 2021 04:30 AM2021-01-25T04:30:51+5:302021-01-25T04:30:51+5:30

कळमनुरी तालुक्यात २० ते २२ पोल्ट्री फार्म आहेत. त्यापैकी २ पोल्ट्री फार्ममध्ये २०००च्या जवळपास पक्षी तथा कोंबड्या आहेत व ...

Appeal for bird flu alert | ‘बर्ड फ्लू’बाबत सतर्कता बाळगण्याचे आवाहन

‘बर्ड फ्लू’बाबत सतर्कता बाळगण्याचे आवाहन

Next

कळमनुरी तालुक्यात २० ते २२ पोल्ट्री फार्म आहेत. त्यापैकी २ पोल्ट्री फार्ममध्ये २०००च्या जवळपास पक्षी तथा कोंबड्या आहेत व उर्वरित १७ पोल्ट्री फॉर्ममध्ये प्रत्येकी ५००च्या जवळपास कोंबड्या आहेत. तालुक्यातील धोंडे पिंपरी येथे कोंबड्यांना ‘बर्ड फ्लू'ची लागण झाल्याने येथील १८७ कोंबड्यांना दया मरण देण्यात आलेले आहे. कोंबड्या, पक्षी आपल्या परिसरात बाधित आढळून आल्यास त्याची माहिती पशु वैद्यकीय दवाखान्याला देण्यात यावी.

बर्ड फ्लूबाबत पक्ष्यांना लक्षणे आढळून आल्यास पशुधन विकास अधिकाऱ्यांना माहिती द्यावी. बर्ड फ्लू हा संसर्गजन्य रोग असून, या रोगापासून सतर्कता बाळगण्याचे आवाहनही करण्यात आले आहे. नागरिकांनी स्थलांतरित पक्ष्यांशी संपर्क टाळावा, पक्ष्यांना देण्यात येणारे पाणी व खाद्याची भांडी दररोज स्वच्छ धुवावीत, पक्ष्यांच्या खुराड्यात स्वच्छता ठेवावी, पक्ष्यांचे लसीकरण करून घ्यावे, पक्षी आजारी व मरतुक आढळून आल्यास त्याची माहिती तत्काळ पशुवैद्यकीय दवाखान्याना द्यावी, असे आवाहनही डॉ. जाधव यांनी केले आहे.

Web Title: Appeal for bird flu alert

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.