गुरांच्या चारा-पाण्यासाठी आवाहन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 6, 2019 12:09 AM2019-01-06T00:09:38+5:302019-01-06T00:10:08+5:30
निर्दयीपणे ट्रकमध्ये कोंबून कत्तलखान्याकडे जनावरे घेऊन जाणारे वाहन पोलिसांनी पकडले होते. या गुरांचा सांभाळ, निवारा तसेच चारा पाण्याच्या सोयीसाठी प्राणीप्रेमी, सेवाभावी संस्था किंवा स्वयंसेवकांनी पुढाकार घेण्याचे आवाहन हिंगोली शहर ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक पी. के. कांबळे यांनी केले आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
हिंगोली : निर्दयीपणे ट्रकमध्ये कोंबून कत्तलखान्याकडे जनावरे घेऊन जाणारे वाहन पोलिसांनी पकडले होते. या गुरांचा सांभाळ, निवारा तसेच चारा पाण्याच्या सोयीसाठी प्राणीप्रेमी, सेवाभावी संस्था किंवा स्वयंसेवकांनी पुढाकार घेण्याचे आवाहन हिंगोली शहर ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक पी. के. कांबळे यांनी केले आहे.
हिंगोली शहरातील नांदेड नाका येथून गुरे घेऊन जाणारा ट्रक पोलिसांनी रात्री १ वाजेच्या सुमारास पकडला. वाहतूक शाखेतील पोलीस कर्मचारी सेनगाव येथून येत असताना त्यांना गुरे घेऊन जाणारा उभा ट्रक आढळला. पोलिसांनी चौकशी केली असता, ट्रकमध्ये निर्दयीपणे गुरे कोंबल्याचे निदर्शनास आले. यातील काही जनावरांचा मृत्यूही झाला. आता पोलिसांच्या ताब्यात असलेल्या ४६ जनावरांची देखभालीसाठी नागरिकांनी मदत करण्याचे आवाहन केले आहे.