कनिष्ठ महाविद्यालये बंदचे आवाहन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 31, 2018 12:24 AM2018-01-31T00:24:16+5:302018-01-31T00:24:19+5:30
विविध मागण्यासाठी जुक्टा संघटनेच्या वतीने २ फेब्रुवारी रोजी कनिष्ठ महाविद्यालय बंदचे आवाहन करण्यात आल्याची माहिती संघटनेचे जिल्हाध्यक्ष गजानन असोलेकर यांनी दिली.
लोकमत न्यूज नेटवर्क
कळमनुरी : विविध मागण्यासाठी जुक्टा संघटनेच्या वतीने २ फेब्रुवारी रोजी कनिष्ठ महाविद्यालय बंदचे आवाहन करण्यात आल्याची माहिती संघटनेचे जिल्हाध्यक्ष गजानन असोलेकर यांनी दिली.
१ नोव्हेंबर २००५ नंतर सेवेत आलेल्यांना जुनी पेन्शन योजना लागू करावी, २०१२ पासूनच्या शिक्षकांना नियुक्ती व मान्यता व वेतन द्यावे, २४ वर्षाच्या सेवेनंतर निवड श्रेणी द्यावी, कायम विना अनुदानित शाळांना अनुदान द्यावे, माहिती तंत्रज्ञान शिक्षकांना अनुदान द्यावे, २००३ ते २०१०-११ पर्यंतच्या वाढीव पदावरील शिक्षकांना नियुक्ती मान्यता देवून वेतन द्यावे, सातवा वेतन आयोग लागू करावा, या मागणीसाठी कनिष्ठ महाविद्यालय बंदचे आवाहन करण्यात आले आहे. जुक्टा संघटनेच्या वतीने विविध मागण्यांसाठी पाच टप्प्यांमध्ये आंदोलन करण्यात येणार आहे. २ फेब्रुवारी रोजी राज्यातील सर्व कनिष्ठ महाविद्यालये बंद करून शिक्षणाधिकारी कार्यालये व मुंबईत आझाद मैदानावर जेलभरो आंदोलनही करण्यात येणार आहे. मागण्या मंजूर न झाल्यास १२ वी परीक्षेनंतर बहिष्कार टाकण्यात येईल, असेही असोलेकर यांनी सांगितले. या आंदोलन कनिष्ठ प्राध्यापकांनी सहभाग नोंदविण्याचे आवाहन संघटनेच्या वतीने करण्यात आले आहे.