कडाक्याच्या थंडीपासून बचाव करण्याचे आवाहन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 28, 2018 12:01 AM2018-12-28T00:01:10+5:302018-12-28T00:02:27+5:30

सध्या कडाक्याची थंडी पडत आहे. त्यामुळे राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकारणाकडून थंडीपासून बचाव करण्यासाठी उपाययोजना सूचविल्या आहेत.

 Appeal to prevent cold winter season | कडाक्याच्या थंडीपासून बचाव करण्याचे आवाहन

कडाक्याच्या थंडीपासून बचाव करण्याचे आवाहन

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
हिंगोली : सध्या कडाक्याची थंडी पडत आहे. त्यामुळे राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकारणाकडून थंडीपासून बचाव करण्यासाठी उपाययोजना सूचविल्या आहेत.
आवश्यकता असल्यासस घराबाहेर पडावे, किंवा घरीच थांबावे.
एकटे राहणाऱ्या वयोवृध्द शेजारच्या व्यक्तींकडे लक्ष द्यावे, उबदार राहणा-या किंवा इमारतीमधील जास्त हवा न येणा-या खोलीमध्ये वास्तव्य करावे. रुमहिटरचा वापर करावा. हिमबाधा झाल्याचे लक्षणे दिसताच डॉक्टरांना भेटावे, स्पर्श केल्यानंतर जाणीव होत नसल्यास किंवा हाताची बोटे, कानाची पाळी, नाकाचा शेंडा यांचा रंग पांढरा किंवा फिक्कट झाल्यास तात्काळ डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. शरीर थंड पडणे, थंडी वाजणे, स्मृतीभृंश होणे, बोलताना विसंगती किंवा अडखळणे, उच्चार स्पष्ट न करता येणे, अंधारी येणे, थकवा जाणवणे इत्यादी लक्षणे आढळल्यास तात्काळ जवळील डॉक्टरांना दाखवावे, असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकाºयांनी केले आहे.

Web Title:  Appeal to prevent cold winter season

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.