डी.एल.एड प्रवेशासाठी ऑनलाईन अर्ज सादर करण्याचे आवाहन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 22, 2020 04:28 AM2020-12-22T04:28:15+5:302020-12-22T04:28:15+5:30

प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य पध्दतीने प्रवेश होईल. यासाठी विद्यार्थी राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे यांच्या ...

Appeal to submit online application for DLED admission | डी.एल.एड प्रवेशासाठी ऑनलाईन अर्ज सादर करण्याचे आवाहन

डी.एल.एड प्रवेशासाठी ऑनलाईन अर्ज सादर करण्याचे आवाहन

googlenewsNext

प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य पध्दतीने प्रवेश होईल. यासाठी विद्यार्थी राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे यांच्या www.maa.ac.in संकेत स्थळावरुन ऑनलाईन अर्ज करु शकतात. याबाबत सविस्तर सूचना, प्रवेश नियमावली व अध्यापक विद्यालय निहाय रिक्त जागा संकेतस्थळावर उपलब्ध आहेत. प्रवेशाची शैक्षणिक पात्रता १२ वी उत्तीर्ण (खुला संवर्ग ४९.५० % व खुला संवर्ग वगळून इतर संवर्ग ४४.५० % गुणांसह) प्रवेश अर्ज ऑनलाईन भरण्याचा कालावधी २२ ते २६ डिसेंबर २०२० पडताळणी अधिकाऱ्यांनी प्रमाणपत्रांची ऑनलाईन पडताळणी करणे व विद्यार्थ्यांनी ऑनलाईन प्रवेश पत्र प्राप्त करणे. २२ ते २७ डिसेंबर प्रवेश अर्ज शुल्क (ऑनलाईन भरणे) खुला संवर्ग रुपये २०० रूपये, खुला संवर्ग वगळून इतर संवर्ग रुपये १०० आहे.

यापूर्वी ज्यांनी अर्ज पूर्ण भरुन अप्रुव्ह करुन घेतला आहे. परंतू प्रवेश घेतलेला नाही असे विद्यार्थी प्रवेश घेऊ शकतात. ज्यांचा अर्ज अपूर्ण किंवा दुरुस्तीमध्ये आहे. तसेच नव्याने प्रवेश अर्ज भरुन प्रवेश घेण्यास इच्छुक असलेले, असे सर्व उमेदवार अर्ज भरु शकतात. अर्ज ऑनलाईन ॲप्रुव्ह केल्याशिवाय उमेदवाराचा प्रवेश प्रक्रियेत समावेश होणार नाही. या प्रक्रीयेमध्ये विद्यार्थ्यांने स्वत:च्या लॉगीन मधूनच प्रवेश घ्यावयाचा आहे. विद्यार्थ्याने अध्यापक विद्यालयाची स्वत: निवड करुन प्रवेशपत्र स्वत:च्या ईमेल लॉगीन मधून प्रिंट घ्यावयाची आहे. त्यानंतर अध्यापक विद्यालयात चार दिवसाच्या आत प्रत्यक्ष उपस्थित राहून प्रवेश घ्यावयाचा आहे. प्रवेश प्रक्रियेच्या या विशेष फेरीनंतर प्रवेशासाठी कोणत्याही परिस्थितीत मुदतवाढ देण्यात येणार नाही, असे अधिव्याख्याता तथा सेवापूर्व विभाग प्रमुख जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था, हिंगोली यांनी कळविले आहे.

Web Title: Appeal to submit online application for DLED admission

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.